शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

उत्पादन शुल्क विभागाची करणी, महिला हॉस्टेल शेजारीच बारची पेरणी

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 15, 2024 09:37 IST

परवाने देताना अटीशर्तींकडे अर्थपूर्ण डोळेझाक

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बारला परवाने देताना शासनाकडूनच नियम गुंडाळले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. एपीएमसीत ३५ वर्षे जुन्या महिला वसतिगृहाच्या बाजूलाच ऑर्केस्ट्रा बारला परवाना दिला आहे. त्याशिवाय नवी मुंबई, पनवेलमध्ये इतरही ठिकाणी शाळा, धार्मिक स्थळे यांना लागून बार चालवले जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. नवी मुंबईसह पनवेलमध्ये बार चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब लोकमतने प्रकाशात आणली आहे. त्यामध्ये पनवेलच्या कोन गावातील शाळेला बारने घेरल्याचे चित्र समोर आले आहे. 

कोपरखैरणेतील ज्ञान विकास शाळेला लागून व सेक्टर २ येथील आदर्श बार रहिवासी इमारतीला लागूनच चालत आहेत. तर शिरवणेत खाली दुकान वर बार असे चित्र असल्याने, नव्याने आलेल्या एखादी व्यक्ती घराचा जिना चढताना चुकीने बारमध्ये जाईल, अशी परिस्थिती आहे.

 महिलांचा विरोध धुडकावला  

केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने अन्नपूर्णा महिला मंडळामार्फत एपीएमसीत महिलांचे वसतिगृह चालवले जात आहे.  सद्यस्थितीला वसतिगृहाचा वापर केवळ कार्यालयीन कामकाजासाठी होत असून त्याठिकाणी ५० ते ६० महिलांची रोज ये-जा असते. काही वर्षांपूर्वी वसतिगृहाला लागूनच ऑर्केस्ट्रा बार सुरू झाला असता महिलांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतरही प्रशासनाने गांभीर्य न घेतल्याने अखेर महिलांनी स्वतःच्या मनाची समजूत काढून परिस्थितीला सामोरे जात आहेत. 

वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराला लागूनच एसबी ऑर्केस्ट्रा बारचे प्रवेशद्वारे असून, काही अंतरावर सेंटर पॉइंट ऑर्केस्ट्रा बार आहे. शिवाय दोन भूखंडापलिकडे लॉजिंग बोर्डिंग चालवले जात आहे. एसबी बारच्या ग्राहकांच्या विशेष सोयीसाठी हे लॉजिंग बोर्डिंग चालत असल्याचे परिसरातील कामगार वर्गाकडून उघड सांगितले जाते. त्यामुळे नोकरी निमित्ताने एखाद्या सर्वसामान्य महिलेने या मार्गावर पाऊल टाकताच तिच्याकडे वाकड्या नजरेने बघितले जात असल्याने महिलांना मान खाली घालावी लागत आहे.

बारसाठी परवाना देण्याकरिता समिती नेमलेली असते. त्यांच्यामार्फत सर्व बाबी पडताळून परवानगी दिली जाते. त्यानंतरही परवान्यावर कोणाची हरकत असल्यास ते न्यायालयात दाद मागू शकतात. - नीलेश सांगडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, ठाणे

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई