शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाटकातील प्रत्येक शब्द लोकांमध्ये पोहोचावा

By admin | Updated: January 11, 2017 06:26 IST

नाटकातील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून भाषेवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर

पनवेल : नाटकातील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून भाषेवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी येथे केले. अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई व कोकण विभागस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारीआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावरकर यांचा या समारंभात समस्त पनवेलकरांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘जो तो माझ्या वयाबद्दल बोलतो. मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमीवर काम करण्याची उमेद आहे,’ असे भावोद्गार सावरकर यांनी काढले. समारंभास लेखक व समीक्षक प्रा. नितीन आरेकर, दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, अभिनेते भरत सावले, जयवंत वाडकर, समीर खांडेकर, नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी, गझलकार ए. के. शेख, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, नगरपरिषदेचे माजी सभापती अनिल भगत, माजी नगरसेवक प्रथमेश सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. नितीन आरेकर म्हणाले, ‘नाटकाचे अस्तित्व आपल्या सर्वांच्या शरीरात आहे. हा धागा व्रताप्रमाणे सांभाळून मनातील नाटक अटल असू द्या. दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी, कलाकारांनी इतर कलाकृती पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी, असे सांगितले. (वार्ताहर)