शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मांजरांनाही सोन्याची किंमत, नवी मुंबईत आशिया खंडातील मोठे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 11:38 IST

फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रविवारी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : हौशेला मोल नसते हे नवी मुंबईमधील आशिया खंडातील सर्वांत मोठे मांजरांचे प्रदर्शन पाहून मुंबई, नवी मुंबईमधील नागरिकांना अनुभवता आले. देशातील २२ शहरांमधून १२ प्रजातींची  ५०० पेक्षा जास्त मांजरे या प्रदर्शनामध्ये पाहता आली. देशात मांजरांनाही साेन्याची किंमत येऊ लागली असून देशभरातील  मार्केटमध्ये  १० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंतचा भावही मिळत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. 

फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रविवारी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये भोपाळ, दिल्ली, जम्मू काश्मीर,  बंगळुरु, मुंबई, कराडसह २२ शहरांमधून आलेली सर्वोत्कृष्ट प्रजातींची मांजरे पाहता आली. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मांजरांची निवड करण्यासाठी इंडोनेशिया, सिंगापूर,मलेशिया येथून परीक्षक बोलावण्यात आले होते. पार्सियन, बेंगाल, मैनकूल, ब्रिटिश शाॅर्ट हेअर, क्लासिक लाँग हेअर, क्लासिकल शॉर्ट हेअरसह एकूण १२ प्रजातींची मांजरे येथे पाहावयास उपलब्ध होती. 

पाळीव प्राण्यांच्या रक्षणाचा संदेश

पाळीव प्राण्यांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी व मांजर पाळणाऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सर्वोत्कृष्ट मांजरांसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी फेलाईन क्लब इंडियाचे मुंबई प्रमुख सुधीर यमगर यांनी दिली. मांजरे पाहून सहभागी झालेल्या नागरिकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. देशभरात चांगल्या प्रजातीच्या मांजरांना १० हजार रुपयांपासून  ५ लाख रुपयांपर्यंत भाव मिळतो अशी प्रतिक्रिया काही जाणकारांनी व्यक्त केली.

सर्वोत्कृष्ट प्रजातींची मांजरे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे प्राप्त झाली. हा एक सकारात्मक उपक्रम असून प्रदर्शन पाहून आनंद झाला. - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

मांजर पाहणाऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी हे प्रदर्शन भरविले आहे. २२ शहरांमधील १२ पेक्षा जास्त प्रजातींची ५००० पेक्षा जास्त मांजरांचा प्रदर्शनात सहभाग होता. - साकीब पठाण, अध्यक्ष फेलाईन क्लब ऑफ इंडिया

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई