शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरीत विकासकामांना गती देण्यासाठी एकच समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:11 IST

घारापुरीची विविध विकासकामे यापुढे एकाच समितीच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.

उरण : घारापुरीची विविध विकासकामे यापुढे एकाच समितीच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. यापुढील बैठक दिल्लीत घेण्यात येणार आहे. दिल्लीत होणाºया बैठकीत बेटावरील नियोजित विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी आणि घारापुरी ग्रामपंचायत यांच्यात चर्चा करण्यात आली.घारापुरी बेटाच्या विकासासाठी विविध समित्या कार्यरत आहेत. मात्र, वेगवेगळ्या समित्या असल्याने विकासकामांबाबत निर्णय घेण्यास विलंब होतो, त्यामुळे नियोजित विकासकामे होण्यासही दिरंगाई होते. यामुळे घारापुरी बेटावरील विकासकामांच्या निर्णयासाठी एकच समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.घारापुरी बेटाच्या प्रस्तावित विकासकामांबाबत याआधी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर मंगळवार, (२६ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीस राजिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, ग्रामविकास अधिकारी अमित तपकिरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.बैठकीत घारापुरी बेटावर प्रस्तावित असलेला घनकचरा व्यवस्थापन करणे (झिरो गार्बेज), ग्राम सचिवालय बांधणे आणि सुशोभीकरण करणे, राजबंदर जेट्टी ते एलिफंटा लेण्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्र ीटीकरण व गटार बनविणे, राजबंदर गावातील अंतर्गत रस्ते बनविणे, शेतबंदर जेट्टी ते राजबंदर जेट्टीपर्यंत संरक्षण भिंत बांधणे, राजबंदर येथील धरणाजवळ पर्यटकांसाठी बगिचा तयार करणे, एलिफंटा गुंफा ते शेतबंदर जेट्टीकडे जाणारा जुन्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, राजबंदर येथील लहान-मोठी जेट्टीची दुरु स्ती, शेतबंदर जेट्टी ते पोलीस चौकीपर्यंत पायरस्त्यावर शेड बांधणे आदी कामांबाबत नियोजन करण्यात येणार आहे.घन कचºयाचे व्यवस्थापन करण्याकरिता डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करणे, घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वैद्यकीय सेवा पुरविणे, शेतबंदर येथील एलिफंटा गुहेजवळील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेमध्ये बगिचा तयार करणे, धरणाच्या व चारही बाजूला सरंक्षण भिंत बांधणे, घारापुरी बेटावर ठिकठिकाणी पर्यटकांसाठी तसेच प्रवाशांसाठी निवारा शेड तयार करणे, राजबंदर जेट्टीवर पाणपोईची सुविधा निर्माण करणे, शेतबंदर ते मोराबंदर दरम्यानचा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, घारापुरी बेटासाठी २४ तास बोट अ‍ॅम्बुलन्सची सेवा पुरविणे आदी प्रस्तावित विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.या कामांबाबत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यासाठी पुढील बैठक दिल्ली येथे बैठक होणार आहे.