शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पर्यटन विकासासाठी समिती स्थापन

By admin | Updated: January 5, 2017 06:08 IST

शहर वेगाने पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. शहराचा पर्यटनदृष्ट्या नियोजनबद्ध विकास होण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी प्रथमच नियोजन व पर्यटन विकास समितीची स्थापना केली.

अलिबाग : शहर वेगाने पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. शहराचा पर्यटनदृष्ट्या नियोजनबद्ध विकास होण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी प्रथमच नियोजन व पर्यटन विकास समितीची स्थापना केली. गटनेता आणि उपनगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीनंतर बुधवारी स्थायी समितीसह विषय समिती सभापतिपदाच्या निवडीही बिनविरोध झाल्या. पाच विषय समित्यांच्या निवडीत तीन समित्यांवर महिला सभापती, तर दोन समित्यांवर पुरु षांना सभापती होण्याचा मान मिळाला.अलिबाग शहरामध्ये जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून गोवा आणि केरळ राज्याने उत्तुंग अशी प्रगती केली आहे. तेथे पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आली आहे. त्याच धर्तीवर अथवा त्याहीपेक्षा थोडी अधिक प्रगती साधायची असेल, तर अलिबाग शहराचा पर्यटनाच्याबाबतीत नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे. यासाठी अलिबाग नगरपरिषदेतीन शेकाप सत्ताधाऱ्यांनी प्रथमच नियोजन व पर्यटन विकास समितीची स्थापना केली आहे. त्या समितीच्या सभापतिपदी माजी उपनगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सुरक्षा शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या सहा निश्चित करण्यात आली आहे, तसेच पाच विषय समित्या राहणार असल्याचे पत्र अलिबाग नगरपालिकेचे गटनेते प्रदीप नाईक यांनी पीठासीन अधिकारी यांना दिले. त्यानुसार बुधवारी अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषदेच्या स्थायी समितीवर नगराध्यक्ष प्रशांत मधुसुदन नाईक हे सभापती असणार आहेत. या समिती सदस्यांमध्ये वीज व सार्वजनिक बांधकाम समिती सभापती विजय (अजय) झुंजारराव, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती मानसी संतोष म्हात्रे, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती राकेश वामन चौलकर, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली राजन ठोसर, नियोजन व पर्यटन विकास समिती सभापती सुरक्षा जगदीश शहा यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.यावेळी सभेसाठी प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गोसावी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक आदींसह नगरसेवक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)