शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांचीसुटका; ट्रेकिंग करताना चुकले होते रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:43 IST

ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत.

नवीन पनवेल : पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या व त्या ठिकाणी अडकून पडलेल्या तिघांची तालुका पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या तिघांना रविवार, १३ सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी खाली आणले.ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंबई, पुणे, रायगड येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक पनवेलमध्ये ट्रेकिंगसाठी येत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने पर्यटकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. परिणामी, पर्यटक चुकीचा रस्ता निवडतात आणि पोलिसांना चकवा देऊन ट्रेकिंगसाठी निघून जातात. अशाच प्रकारे १३ सप्टेंबर रोजी मालाड, मुंबई येथील ओमकार शेट्टी, जयेश मेहता, पुनीत बेहलानी हे तिघेजण पेबगडला ट्रेकिंगसाठी निघाले. पनवेल तालुक्यातील धोदानी-मालडुंगे येथून येथे त्यांनी आपली कार पार्क केली आणि ते पायी चालत ट्रेकिंगसाठी निघाले. पेबगडच्या दिशेने जात असताना ते रस्ता भरकटले. यावेळी त्यांनी नेरे येथील रूपेश पाटील यांना फोन केला व ते रस्ता चुकले असल्याचे त्यांनी त्याला सांगितले.यावेळी हे तिघेही रस्ता चुकल्याने पाय घसरून पडले होते व त्यांना थोड्या-फार जखमा झाल्या होत्या. त्यानंतर, पाटील यांनी याची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्या तीन तरुणांनी धबधब्याजवळ उभे असल्याचे सांगितले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी त्या ठिकाणी पोलीस पाठविले.तरु णाची मदतठिकाणांची माहिती नसल्याने पोलिसांनी संतोष नामक एका आदिवासी मुलाला सोबत घेत सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी या तिघांनाही सुखरूप खाली आणले, त्यांना मालाड येथे जाण्यास परवानगी दिली.

टॅग्स :panvelपनवेल