शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ईएसआयसी कामगार वसाहत मोडकळीस

By admin | Updated: June 20, 2017 06:02 IST

पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे.

सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. प्रशासनाकडून त्यांच्या राहण्याची पर्यायी सोय केली जात नसल्यामुळे, ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. पालिकेने गतवर्षी त्या ठिकाणच्या चार व यंदा नऊ इमारती धोकादायक घोषित करून संपूर्ण वसाहतच राहण्यायोग्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र, यानंतरही कामगारांची राहण्याची पर्यायी सोय न करता, ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कामगारांच्या जीवावर टांगती तलवार निर्माण केली आहे.शासनाच्या वाशीतील कामगार रुग्णालयाचे कामगार मागील अनेक वर्षांपासून रोज मृत्यूशी सामना करत आहेत. इमारत मोडकळीस आलेली असतानाही, त्यांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. काही कामगार निवृत्तीच्या टप्प्यावर असल्यामुळे त्यांच्याकडून आलेला दिवस कसाबसा काढण्याचे काम सुरू आहे. मागणी करूनही रुग्णालय प्रशासन कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवत नसल्याचीही खंत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनच कामगारांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. गतवर्षी महापालिकेने त्या ठिकाणच्या चार इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. या वेळी तीन इमारतींमधील कामगारांना चौथ्या धोकादायक इमारतीमध्ये कोंबून सर्वांनाच मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच यंदा महापालिकेने त्या ठिकाणच्या उर्वरित नऊ इमारतीही धोकादायक घोषित केल्या आहेत. सर्वच इमारतींची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नसल्यामुळे या इमारती मोडकळीस आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात इमारतींची डागडुजी झाली नसली, तरी प्रतिवर्षी डागडुजीचा खर्च मात्र मंजूर होत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. यामुळे देखभाल-दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराचे बळी कामगार ठरू नयेत, याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.मोडकळीस आलेल्या इमारतींची डागडुजी केल्यानंतर त्या इमारतींचा रहिवासी वापर होऊ शकतो. यामुळे अनेकदा कामगारांनी इमारतींसह संपूर्ण घरांच्या डागडुजीची मागणी केली आहे; परंतु निधीअभावी इमारतींच्या डागडुजीला टाळाटाळ करणारे वरिष्ठ अधिकारी, मर्जीतल्या कामगारांच्या घरांवर मात्र लाखोंचा खर्च करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. मोडकळीस आल्याने खंडर झालेल्या इमारतींभोवती झाडी वाढली असून, त्यामध्ये विषारी प्राण्यांचे वास्तव्य होऊ लागले आहे. मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी साप आढळून आले असल्याने लहान मुलांचे घराबाहेर खेळणेही धोकादायक झाले आहे.