शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नमो खारघर मॅरेथॉन २०२४' ला उस्फूर्त प्रतिसाद; १९ हजार ६०१ स्पर्धक धावले 

By वैभव गायकर | Updated: January 14, 2024 15:17 IST

पुरुष खुला गटात मृणाल सरोदे  तर महिला खुला गटात अर्चना जाधव यांनी पटकावला विजेतेपदाचा किताब 

लोकमत न्युज नेटवर्क वैभव गायकर,पनवेल:रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी' हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन पार पडलेल्या 'नमो खारघर मॅरेथॉन २०२४' स्पर्धेत तब्बल १९ हजार ६०१  स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही मॅरेथॉन उदंड केली. 

 या स्पर्धेतील पुरुष खुला गटात मृणाल सरोदे  तर महिला खुला गटात अर्चना जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावित विजेतेपदाचा किताब पटकावला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॅरेथॉनने आतापर्यंतच्या सहभागाचे रेकॉर्ड यावेळी मोडले.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत होते.

यंदाची हि स्पर्धा १४ वी होती. स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, अशा गटात मॅरेथॉन झाली.  विजेत्या स्पर्धकांना रक्कम स्वरूपात तसेच मेडल, सर्टिफिकेट आदी बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, संजय भगत, समीर कदम आदींसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेते स्पर्धक -पुरुष खुला गट -  अंतर १० किलोमीटरप्रथम क्रमांक-  मृणाल सरोदे  (२५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)

 महिला खुला गट - अंतर १० किलोमीटरप्रथम क्रमांक- अर्चना जाधव  (२५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)

१७ वर्षाखालील मुले गट- अंतर ०५ किलोमीटरप्रथम क्रमांक- राज भगत  (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)

 १७ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटरप्रथम क्रमांक- मयुरी चव्हाण  (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)

 १४ वर्षाखालील मुले गट- अंतर०५ किलोमीटरप्रथम क्रमांक- ओमकार पाटील  (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)

 १४ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटरप्रथम क्रमांक-  पुजा चव्हाण (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)

 खारघर दौड - (वैयक्तिक, शालेय, सोयायटी, व इतर अशा चार गटात )- अंतर ०३ किलोमीटर  स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

 ज्येष्ठ नागरिक  दौड (पुरुष गट )- अंतर ०२ किलोमीटर प्रथम क्रमांक- अनिल खंडेलवाल  (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)

ज्येष्ठ नागरिक  दौड (महिला गट )- अंतर ०२ किलोमीटर प्रथम क्रमांक- अल्फीया अदिब  (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)