शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवासीयांची गावाशी नाळ जोडण्याचा अखंड प्रयत्न

By वैभव गायकर | Updated: June 11, 2023 13:41 IST

माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याची नाळ आपल्या गावाशी अथवा जन्मभूमीशी जोडलेली असते.

- वैभव गायकर, माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याची नाळ आपल्या गावाशी अथवा जन्मभूमीशी जोडलेली असते. ती जोडलेली असावी या हेतूने काम करणारे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेलमध्ये कार्यरत आहे. जवळपास ६०० सभासदांचा समावेश असलेल्या या संघात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पनवेलमध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांचा समावेश आहे. १९८७ साली या संघाची स्थापना दिवंगत प्रभाकर तावडे यांनी केली.

सिंधुदुर्गवासीयांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास तसेच रोजगार, उद्योग उभारणीसाठी ही संस्था कार्यरत आहे. आजवर आपल्या बांधवांच्या हितासाठी रक्तदान, आरोग्य शिबिर, होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, अनाथ मुलांना दिवाळी फराळवाटप, कोकणातील रखडलेल्या मार्गासाठी आंदोलन, मालवणी जत्रोत्सव व कौटुंबिक संमेलन, वृक्षारोपण आदींसह अनेक कार्यक्रम ही संस्था राबवते.

संस्कृती टिकविण्याचे काम

- संस्थापक सदस्यांमध्ये प्रभाकर तावडे यांच्यासह अरविंद पाटकर, भास्करराव धुरी, भाऊ परब, भाई परब, अविनाश सावंत आदींचा समावेश होता. - कोकणातून पनवेलसारख्या शहरात स्थायिक झाल्यानंतर आपल्या गावाची संस्कृती शहरातदेखील टिकविण्याचे काम हे संघ प्रामाणिकपणे करतात. - सिंधुदुर्गवासीयांना एकत्र आणून या रहिवाशांचा सर्वांगीण विकास व अडचणीच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी सोडवणे व त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आधुनिक युगाच्या काळात संघाची माहिती आधुनिक प्लॅटफॉर्मवर अर्थातच वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे www.szrhspanvel हे संकेतस्थळ कार्यरत आहे.

संघाचे पदाधिकारी

अध्यक्ष - केशव राणे, उपाध्यक्ष - संतोष चव्हाण आणि प्रिया खोबरेकर, सचिव -  रामचंद्र मोचेमाडकर

मागील ३६ वर्षांपासून आमचा संघ पनवेलसारख्या शहरात कार्यरत आहे. या कालावधीत असंख्य समाजहिताची कामे आम्ही केवळ सिंधुदुर्गातील रहिवाशांसाठी नव्हे, तर सर्वच समाजबांधवांसाठीच केली. वेगवेगळे सामाजिक कार्य आम्ही केले आहे. हा वारसा पुढेही सुरूच राहणार आहे. - केशव राणे, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ

 

टॅग्स :panvelपनवेल