शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या भूखंडांवर भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:27 IST

घणसोलीतील प्रकार; वर्षभरात ४ वेळा कारवाई; परिस्थिती जैसे थे!

- अनंत पाटील नवी मुंबई : घणसोलीत सिडकोच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडांवर भंगारमाफियांनी अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी भूखंड नसल्याची ओरड सिडकोच्या संबंधित विभागाकडून केली जात आहे. मात्र त्याच वेळी सिडकोच्या मालकीच्या मोक्याच्या भूखंडांवर बिनदिक्कत अतिक्रमण केले जात असल्याचे दिसून आले आहे. हे भूखंड अतिक्रमणमुक्त करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.घणसोली सेक्टर २५ येथे तळवली-घणसोली मार्गावर दत्तनगर येथे मोक्याच्या ठिकाणी सिडकोचे अनेक मोकळे भूखंड आहेत. त्या भूखंडांवर सिडकोने आपल्या मालकीचे फलकही लावले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत भंगार व्यावसायिकांनी त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे येथील अतिक्रमणांवर सिडकोच्या माध्यमातून अनेकदा कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरसुद्धा परिस्थिती जैसे थे असल्याने सिडकोच्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण गेल्या वर्षभरात येथील भंगारमाफियांवर तीन ते चार वेळा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरसुद्धा येथील भंगारचा व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी याच अतिक्रमण करण्यात आलेल्या भंगार व्यावसायिकांवर चार वेळा कारवाई करण्यात आली होती. नवी मुंबई आणि रायगड परिसरातील ९५ गावांतील शेतजमिनी शासनाने संपादित केल्या आहेत. मात्र कवडीमोल दराने आपल्या जमिनी देणारे प्रकल्पग्रस्त मात्र अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे भूखंड उपलब्ध नसल्याचे कारण देत सिडकोने साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप बंद केले आहे. त्याच वेळी सिडकोचे कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडांवर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. हे भूखंड अतिक्रमणमुक्त करून साडेबारा टक्के भूखंड वाटपाची योजना पूर्ण करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.अनधिकृत बांधकामांचे पेवघणसोली विभागात तळवली, गोठीवली, घणसोली, नोसिल नाका झोपडपट्टी आणि रबाळे गाव येथे महापालिका आणि सिडकोच्या संबंधित विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अतिक्रमणाचे पेव फुटले आहे. या परिसरात दिवसाआड नवीन बांधकामे उभारली जात आहेत. विशेष म्हणजे या बांधकामांसाठी लागणारे साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. त्यामुळे वाहतुकीलासुद्धा अडथळा निर्माण होत आहे. अनधिकृत बांधकामांसाठी साहित्य पुरवठा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे घणसोली येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावपाळी ते दत्तनगर दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :cidcoसिडकोEnchroachmentअतिक्रमण