शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

ट्री बेल्टवर अतिक्रमण

By admin | Updated: April 25, 2016 03:11 IST

जुहूगावच्या खाडी किनाऱ्यावरील ट्री बेल्टसाठी आरक्षित असलेली जागा हडप करण्याचे जोरदार प्रयत्न काही भूमाफियांकडून सुरू आहेत. काहींनी जागेला कुंपण घालून त्याचा खासगी वापर चालविला आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईजुहूगावच्या खाडी किनाऱ्यावरील ट्री बेल्टसाठी आरक्षित असलेली जागा हडप करण्याचे जोरदार प्रयत्न काही भूमाफियांकडून सुरू आहेत. काहींनी जागेला कुंपण घालून त्याचा खासगी वापर चालविला आहे, तर काहींनी चायनिज धाबे व इतर व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिल्याचे दिसून आले आहे. जुहूगावात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. मोकळ्या जागा बळकावून त्यावर इमले उभारण्याची येथे स्पर्धाच सुरू आहे. गावातील मोकळ्या जागा आता संपुष्टात आल्याने भूमाफियांनी शेजारच्या खाडी किनाऱ्यालगत असलेल्या ट्री बेल्टकडे आपला मोर्चा वळविला आहे. सिडकोने जुहूगाव परिसरात खाडी किनाऱ्याला लागून सेक्टर १0 येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वसाहतीपासून सेक्टर १२ येथील ओरिएंटल कॉलेजपर्यंतचा पट्टा ट्री बेल्ट म्हणून आरक्षित केला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून या भागाचे संवर्धन केले जाते. तसे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र या फलकाला भीक न घालता भूमाफियांनी या मोकळ्या पट्ट्याच्या काही भागात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी पत्र्याचे कुंपण लावून जागा बळकावल्या आहेत, तर काहींनी बळकावलेल्या जागा लाकडाच्या वखारी, भंगार विक्रेते, बांधकाम व्यावसायिकांना सेंट्रिंगचे साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने दिल्या आहेत.बळकावलेल्या जागांना पत्र्याचे कुंपण ठोकून काहींनी चायनिजचे धाबे सुरू केले आहेत. महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने तर या ठिकाणी चक्क धार्मिक स्थळ उभारले आहे. या ट्री बेल्टच्या खाडीकडील बाजूस महापालिकेने एक छोटा रस्ता बनविला आहे. परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी त्याचा वापर करतात. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांना दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी सुध्दा हा रस्ता उपयुक्त ठरला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्याच्या मधोमध डेब्रिजची गाडी रिकामी करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना व रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्याचा अडथळा होत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे सिडको आणि महापालिका या दोन्ही प्रशासनाने सोयीस्कररीत्या पाठ फिरविली आहे. महापालिकेच्या विभाग कार्यालयाने तर अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.