शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याच्या भूखंडावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:20 IST

सानपाडा येथील प्रकार : परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

नवी मुंबई : सानपाडा पोलीसठाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या भूखंडावरील भंगार वाहनांचे अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. परिणामी, त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.सानपाडा सेक्टर १४ येथे पोलीसठाण्यासाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. सध्या ज्या ठिकाणी सानपाडा पोलिसांचा कारभार चालत आहे, ती जागा अपुरी शिवाय तात्पूर्त्या स्वरूपाची आहे. यामुळे त्या ठिकाणी पोलिसांसह तक्रारीच्या निमित्ताने येणाऱ्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सानपाडा पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र जागा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत करण्यात आला होता.त्यानुसार सानपाडा सेक्टर १४ येथील १ क्रमांकाचा भूखंड पोलीस ठाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे; परंतु विविध कारणांमुळे अद्याप त्या ठिकाणी पोलीसठाण्याची इमारत उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे हा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून मोकळा पडल्याची संधी साधून त्यावर भंगारातील वाहने साठवण्यात आली आहेत. अशातच पावसामुळे सदर भूखंडावर झुडपे वाढली आहेत. तर भंगारातील वाहनांमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची पैदास होत आहे. शिवाय, परिसरातील भटकी कुत्रीही त्याच ठिकाणी दबा धरून बसत असून, संधी साधून पादचाऱ्यांवर हल्ला करत आहेत.पालिकेने स्वच्छता अभियान राबवताना विविध ठिकाणी रस्त्यावर नादुरुस्त स्थितीमध्ये उभी असलेली ही वाहने उचलून त्या ठिकाणी जमा केली आहेत, त्यामुळे एकीकडे शहर स्वच्छता अभियान राबवताना, दुसरीकडे ठरावीक नोडचे विद्रूपीकरण केले जात असल्याचा संताप सानपाडातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, हा भूखंड पोलीसठाण्यासाठी असल्याने त्याचा वापर करण्यासाठी पोलिसांचीही परवानगी घेण्यात आलेली नाही.परिणामी, ही वाहने त्या ठिकाणावरून हटवावीत यासाठी स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते.त्यानंतरही प्रशासन ही वाहने त्या ठिकाणावरून हटवण्यात उदासीनता दाखवत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पोलीस ठाण्यासाठी राखीव असलेल्या मोकळ्या भूखंडावर पालिकेनेच साठवलेल्या भंगारामुळे परिसराची शोभा जात आहे. शिवाय त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाहने त्या ठिकाणावरून हटवण्यात यावी यासाठी यापूर्वी आंदोलनही करण्यात आलेले आहे. त्यानंतरही तिथले भंगार हटवले जात नसल्याने पालिकाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे.- दशरथ भगत, माजी नगरसेवक