शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यात ८७५० उमेदवारांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:36 IST

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने नवी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल ८७५० उमेदवारांनी नाव नोंदणी केली.

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने नवी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल ८७५० उमेदवारांनी नाव नोंदणी केली. १७५ कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दिवसभरामध्ये ३३०६ जणांच्या मुलाखती होऊन १६०२ जणांना प्रत्यक्षात नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचे रोजगार मेळावे घेतले जाणार असल्याचे यावेळी उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.वाशी रेल्वे स्टेशनसमोरील सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रात ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि सीआयआय या उद्योग संघटनांचा या उपक्र मात सहभाग होता. सुभाष देसाई यांनी प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकारचे मेळावे आयोजित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून यापूर्वी एअर इंडिया, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे नाव या रोजगार मेळाव्याला दिले आहे. राज्यात गुंतवणूक वाढत असून रोजगाराच्या संधीही वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे व कल्याण परिसरामध्येही अशाप्रकारचे मेळावे आयोजित करावे अशी सूचना केली. रोजगार मेळाव्यामुळे एकाच छत्राखाली विविध प्रकारच्या नोकऱ्या मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्यामुळे या मेळाव्यांची गरज असल्याचे स्पष्ट केले. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही रोजगार इच्छुकांनीही संकुचित वृत्ती सोडून आणि केवळ तात्कालिक विचार न करण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन केले आहे.