शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वंडर्स पार्कमधील कर्मचाऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: March 28, 2016 02:32 IST

नेरूळमधील वंडर्स पार्कमधील पालिकेच्या कर्मचाऱ्यांची तीन वर्षांपासून पिळवणूक सुरू आहे. पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्या दिल्या जात नाहीत. सण, उत्सवामध्येही

नवी मुंबई : नेरूळमधील वंडर्स पार्कमधील पालिकेच्या कर्मचाऱ्यांची तीन वर्षांपासून पिळवणूक सुरू आहे. पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्या दिल्या जात नाहीत. सण, उत्सवामध्येही कामावर यावे लागत आहे. सुटी दिवशी केलेल्या जादा कामाचा मोबदला देण्याचे आश्वासन देवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २४ ते २७ मार्च अशा चार दिवस सुट्या होत्या. जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे व त्यांच्यासारखे काही प्रामाणिक कर्मचारी वगळता इतर सर्वांना दुसरा व चौथा शनिवार, प्रत्येक रविवार व सर्व सुट्या मिळत असतात. परंतु या नियमाला नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपवाद आहे. येथे तिकीट विक्रीपासून इतर महत्त्वाची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर आहे. डिसेंबर २०१२ मध्ये उद्यानाचे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तेव्हापासून या कर्मचाऱ्यांना सोमवारी साप्ताहिक सुटी दिली जात आहे. दुसरा व चौथ्या शनिवारची सुटी रद्द झाली आहे. मनपा कर्मचारी उत्सव कुटुंबियांसोबत साजरा करतात. परंतु वंडर्स पार्कमधील कर्मचारी सणाच्या दिवशीही त्यांचे कर्तव्य बजावत असतात. वंडर्स पार्कमधील कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला दिला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जादा कामाचाही मोबदला दिला जाणार होता. परंतु तब्बल तीन वर्षे त्यांना फक्त आश्वासनच दिले जात आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी वंडर्स पार्क बंद ठेवले जात होते. परंतु यावर्षी फूड कोर्ट चालकाच्या आग्रहास्तव उद्यान सुरूच ठेवण्यात आले. यामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)सुरक्षा रक्षकांचीही कसरतवंडर्स पार्कमध्ये सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक सुटीही दिली जात नाही. वास्तविक कायद्याप्रमाणे सुरक्षा रक्षकांनाही ८ तासांची ड्युटी दिली पाहिजे. परंतु याठिकाणी कामगारांना १२ तास काम करावे लागत आहे. सुटी न घेता सलग काम केल्यामुळे त्याचा परिणाम कामगारांच्या आरोग्यावर होवू शकतो. नोकरी गमावण्याच्या भीतीने सुरक्षा रक्षक कोणतीही तक्रार न करता १२ तास कर्तव्य बजावत आहेत.