शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढतोय

By admin | Updated: July 25, 2016 03:14 IST

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईची भीती वाटू लागली आहे. कामात चूक झाली तर शिक्षेची तरतूद आहे

नवी मुंबई : पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईची भीती वाटू लागली आहे. कामात चूक झाली तर शिक्षेची तरतूद आहे, पण चांगले काम केल्यास प्रोत्साहन देण्याची काहीच व्यवस्था नाही. कार्यक्षमता वाढविण्यासाठीही प्रयत्न होत नाहीत. सिडकोमध्ये संजय भाटीया यांनी राबविलेला पारदर्शी कारभाराचा पॅटर्न पालिकेत राबविण्याची मागणी होऊ लागली आहे. महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी दोन आठवड्यांत प्रशासनामधील बेशिस्तपणा मोडीत काढला आहे. कर्मचारी वेळेवर कामावर येऊ लागले आहेत. कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे. सुटीच्या दिवशीही अनेक कर्मचारी काम करीत आहेत. पालिकेच्या कामकाज पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला असला तरी कर्मचाऱ्यांवरील कारवाईची टांगती तलवार अद्याप दूर झालेली नाही. कधीही कोणत्याही चुकांसाठी निलंबित किंवा वेतन कपातीची कारवाई होण्याची भीती वाटत आहे. आयुक्तांच्या दराऱ्यामुळे कोणीही उघडपणे बोलत नसले तरी कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे. अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात आहे व येथील अधिकाऱ्यांना योग्य वागणूक दिली जात नसल्याची चर्चा आहे. चार वर्षांपूर्वी महापालिकेपेक्षाही सिडकोची भ्रष्टाचारासाठी प्रतिमा मलिन झाली होती. सिडको म्हणजे भ्रष्टाचार, असे अनेक जण खासगीत बोलू लागले होते. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संजय भाटीया यांची नियुक्ती झाल्यानंतर सिडकोमधील भ्रष्टाचार थांबला. भाटीया यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार स्वीकारताच यापूर्वी काय झाले मला माहीत नाही, परंतु यापुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले. निष्काळजी व कामचुकार कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मानसिक ताण कमी करण्यासाठी व आरोग्यरक्षणासाठी शिबिरांचे आयोजनही केले होते.