शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेमुळे पडीक जागांवर फुलली हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:32 IST

१५ हजार नवीन झाडे; उद्यानांमध्ये भर

- योगेश पिंगळेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे अमृत योजनेमुळे नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आणि घणसोली येथील हिरवळीसाठी आरक्षित असलेल्या, परंतु पडीक पडलेल्या जागांवर हिरवळ दाटली आहे. या योजनेअंतर्गत विविध फळे आणि फुलांची सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आली असून यामुळे शहराच्या उद्यानांमध्ये देखील भर पडली आहे.नवी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून शेकडो उद्याने विकसित करण्यात आली आहेत. याठिकाणी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, खेळणी आदी सुविधा देण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी देखील पसंती दिली आहे. देशातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारावा तसेच देशात स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार व्हावीत शहरामधील मोकळ्या जागांवर हरित क्षेत्र निर्माण व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील विविध शहरांमध्ये अमृत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ७५ टक्के राज्य शासनाकडून २५ टक्के आणि महापालिकेचा २५ टक्के निधी वापरला जातो. सदर योजना राज्यातील सुमारे ४३ शहरांमध्ये राबविण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने पडीक भूखंडांवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून आंबा, निम, नारळ, सुपारी, काजू, चिकू, पेरू आदी फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. २0१५-१६ मध्ये नेरु ळ सेक्टर २६ मधील ज्वेल पार्क येथे सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेवर हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे १९२४ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २0१६ - १७ मध्ये घणसोली सेक्टर ९ येथे नाल्यालगत आरक्षित आणि पडीक सुमारे १२ हजार चौरस मीटर क्षेत्रात हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे ३८४५ वृक्षांची लागवड केली आहे.२0१७ - १८ मध्ये सानपाडा सेक्टर ३0 ए आणि वाशी सेक्टर १0 ए या दोन्ही ठिकाणी सुमारे १५ ते १८ हजार चौरस मीटर क्षेत्रात सुमारे ८९६८ वृक्षांची लागवड केली. याशिवाय नागरिकांसाठी नैसर्गिक पदपथ तयार करण्यात आला असून लॉन विकसित करण्यात आली आहे. विविध झाडांच्या जाती, त्यांची नावे, फायदे, झाडांमुळे येणारे विविध पक्षी, फुलपाखरे याबाबत माहिती असलेले फलक बसविण्यात आले आहेत. अमृत अभियानामुळे शहरात वृक्षांची संख्या वाढली असून शहरातील उद्यानामध्ये देखील भर पडली आहे.