शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘एलिफंटा’ परिसरातील तडे वाढले

By admin | Updated: August 10, 2016 03:22 IST

एलिफंटा लेणी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात वाढ झाली असून जमिनीला तडे जाण्याचे प्रमाण ५५ मीटरपर्यंत पोहोचले आहे

उरण : एलिफंटा लेणी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात वाढ झाली असून जमिनीला तडे जाण्याचे प्रमाण ५५ मीटरपर्यंत पोहोचले आहे. बुधवारी पुरातत्व आणि उरण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी एलिफंटा पर्यटन स्थळाची संयुक्तपणे पाहणी केली. या पाहणीत तडे जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी गणपत शिंगाडे यांनी दिली. लेण्यांलगत असलेल्या भुसभुसीत मातीमुळे भूस्खलन होत असून भविष्यात लेणी परिसराची हानी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत. यासाठी लेणी परिसराचा हायड्रोलिक सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती एलिफंटा केव्हजचे केअरटेकर कैलास शिंदे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे जगप्रसिद्ध एलिफंटा केव्हज परिसरालगत जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने शिवसेना उपविभाग प्रमुख आणि घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी उरण तहसीलदारांसह पुरातत्व विभागाकडे तक्रार करून पर्यटन क्षेत्रात अपघातासारखी घटना घडण्याआधीच तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती. बळीराम ठाकूर यांच्या तक्रारीची दखल घेवून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एलिफंटा लेणी परिसराकडे धाव घेवून मंगळवारी (९ आॅगस्ट) पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारीही पुरातत्व आणि उरण महसूल विभागाचे गणपत शिंगाडे, मंडल अधिकारी गणपत ठाकूर, तलाठी दिनकर पवार आदि अधिकाऱ्यांनी एलिफंटा पर्यटन स्थळाची संयुक्तपणे पाहणी केली. या पाहणीत तडे जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी गणपत शिंगाडे यांनी दिली. भूस्खलनामुळे लेणीलगत संरक्षक भिंत परिसरातील जमिनीला कालच्या २५ मीटरवरून ५५ मीटर लांबीपर्यंत तडे गेले आहेत. याबाबत पंचनामा करण्यात आला असून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी गणपत शिंगाडे यांनी दिली. (वार्ताहर)