शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेकडून वीज ग्राहकांची अडवणूक

By admin | Updated: November 16, 2016 04:48 IST

वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची पतसंस्थेकडून अडवणूक करण्यात येत असून बिलाच्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित १०० - १२५ रु पये परत

पनवेल : वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची पतसंस्थेकडून अडवणूक करण्यात येत असून बिलाच्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित १०० - १२५ रु पये परत करण्यास नकार देत आहेत. जास्त कमिशन मिळावे म्हणून पूर्ण पैसे जमा करण्याची सक्ती ग्राहकांवर करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नवीन पनवेलमधील एका सहकारी पतपेढीवर कारवाईची मागणी केली आहे. वीजबिल भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारने जुन्या नोटा वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर १५ ए मध्ये असलेल्या एका सहकारी पतपेढीत वीजबिल भरण्यासाठी जाणाऱ्यांना सुटे पैसे परत न देता बिलाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्याची सक्ती करण्यात येत असल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे. एका ग्राहकाचे वीजबिल २८५० इतके होते, त्याने हजाराच्या ३ नोटा दिल्यावर त्याला उर्वरित पैसे परत करण्यास नकार देण्यात आला. या वेळी अन्य एका ग्राहकाने १०० च्या व १० ते २० रुपयांच्या नोटा देऊन बिल भरल्याने सुट्या पैशांचा अभाव असेही म्हणता येणार नाही. याबाबत विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, वरिष्ठांकडून तसे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पतसंस्थांना भरणा झालेल्या रकमेवर कमिशन मिळते. ग्राहकांकडून जास्त पैसे असल्यास कमीशनही जास्त मिळत असल्याने अडवणूक करण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.