शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत कपबशी शेकापसाठीच राखीव

By admin | Updated: May 10, 2017 00:30 IST

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने कपबशी हे चिन्ह आरक्षित ठेवण्याकरिता पत्र दिले होते.

अरुणकुमार मेहत्रे। लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने कपबशी हे चिन्ह आरक्षित ठेवण्याकरिता पत्र दिले होते. मात्र रासप आणि भारिपकडूनही या चिन्हाची मागणी करून लालबावट्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. आधीच्या निवडणुकीत किमान पाच टक्के उमेदवार निवडून आले असतील तर संबंधित पक्षाकरिता हे चिन्ह राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार शेकापला मागील निवडणुकीत यश मिळालेले आहे. परंतु इतर दोन पक्ष त्यामध्ये बसत नसल्याने त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने नामंजूर केला. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप उमेदवाराला कपबशी चिन्ह मिळणार आहे.खटारा चिन्हानंतर शेतकरी कामगार पक्षाला कपबशीवर कमालीचे यश मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि कोकण शिक्षक मतदार संघात शेकापने या चिन्हावर निवडणुका जिंकल्या. त्यामुळे पनवेल महानगरपालिका सुध्दा याच चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून शेकापकडून या चिन्हाचे ब्रँडिंग करण्यात आले. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर कपबशीचा प्रचार सुरू करण्यात आला होता. आजही अनेक ठिकाणी फक्त या निशाणीचा प्रचार आणि प्रसार करणारे फलक लावण्यात आले आहेत. असे असताना राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणूक विभागाकडे कपबशी चिन्हाकरिता अर्ज केला. याशिवाय भारिप बहुजन महासंघाने सुध्दा हे चिन्ह आमच्या उमेदवारांकरिता राखीव ठेवण्याची मागणी करून शेकापला ऐन मोक्याच्या क्षणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. या दोनही पक्षाने दावा केल्यामुळे कपबशी हे चिन्ह मिळेल की नाही असा प्रश्न नेते आणि शेकापच्या उमेदवारांनाही पडला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नोंदणीकृत राजकीय पक्षाने नजीकच्या निवडणुकीत एकूण जागेपैकी पाच टक्के जागेवर विजय मिळवला तर त्या पक्षाला आगामी निवडणुकीत त्या पक्षाच्या उमेदवारांकरिता मुक्त चिन्हपैकी एक मागणी केलेले चिन्ह आरक्षित ठेवता येण्याची तरतूद आहे. या तत्त्वाचा शेकापने आधार घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे कपबशीचा दावा केला. पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये २0१२ मध्ये जिल्हा परिषदेत ७ पैकी ६ गटात आणि पंचायत समितीमध्ये ११ पैकी ५ सदस्य निवडून आले होते. त्याचबरोबर २0११ साली झालेल्या पनवेल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३८ नगरसेवकांपैकी शेकापचे संख्याबळ नऊ होते. त्यानुसार शेकापकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकरिता कपबशी हे चिन्ह आरक्षित करण्यात येत असल्याचे आदेश निवडणूक अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी ६ मे रोजी पारित केले आहेत.