शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीला निवडणुकीचे वेध

By admin | Updated: June 23, 2017 06:09 IST

रायगड जिल्हा नियोजन समितीची निवडणूक घेण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समितीची निवडणूक घेण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एक पनवेल महापालिका आणि पाच नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रातील सदस्यांची संख्या कमी होऊन ती महापालिकेसह नगरपंचायतीमध्ये विभागली जाणार आहे. केंद्रासह राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचे नियोजन करून जिल्ह्यामध्ये नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा नियोजन समितीमार्फत केले जाते. जिल्ह्याचे पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतात. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या निकषावर समितीमधील सदस्यांची संख्या अवलंबून असते. २०११ च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ३४ हजार २०० आहे. २० लाखांपेक्षा जास्त आणि ३० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असल्याने जिल्हा नियोजन समितीची सदस्य संख्या ही ४० अनुज्ञेय ठरते. पैकी ४/५ अर्थात ३२ सदस्य निवडणुकीद्वारे निवडून द्यायचे आहेत. त्याला अनुसरून ग्रामीण, लहान नागरीक्षेत्र आणि मोठ्या क्षेत्राची लोकसंख्या विचारात घेतली जाते.रायगड जिल्हा नियोजन समितीवर पूर्वी ग्रामीण क्षेत्रातून २४ तर, लहान नागरी क्षेत्र म्हणजे नगरपालिका क्षेत्रातून ८ सदस्य निवडून द्यावे लागत होते; परंतु पनवेल महानगरपालिका आणि पाच नगरपंचायती अस्तित्वात आल्याने निवडून द्यायची सदस्य संख्या विभागली जाणार आहे. त्यानुसार ग्रामीण क्षेत्रातून २२, नगरपंचायतीमधून १, नगरपालिकेतून ३ आणि महानगरपालिकेतून ६ सदस्य निवडून द्यायचे आहेत.सदस्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर त्यासदस्यांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गप्रमाणे आरक्षण, तसेच ५० टक्के महिला आरक्षण समांतर पद्धतीने काढावे लागणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे प्रवर्गाचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात करावे लागणार आहे. तसेच मागास प्रवर्गाचे एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आरक्षण निश्चित करावे लागणार आहे.अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी चार, नागरिकांचा मागास प्रवर्ग १० आणि १७ जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहणार आहेत. महिला समांतर आरक्षणात अनुसूचित जमातीच्या दोन महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गातील पाच, तर सर्वसाधारण गटातून नऊ अशा एकूण १६ महिला जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करणार आहेत, उर्वरित १६ जागांवर पुरुषांना प्रतिनिधित्व करायला मिळणार आहे.1नगर पंचायतीची लोकसंख्या ४८ हजार २१३ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ही तीन हजार ७६५ आहे, तर दोन हजार ४१४ एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे. त्यामुळे येथे फक्त सर्वसाधारणसाठी एकच जागा आरक्षित राहणार आहे.2नगरपालिकेची लाकसंख्या दोन लाख ६८ हजार १३६ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ही १९ हजार २१४ आहे, तर १२ हजार २४९ एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे. त्यामुळे येथे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकच आरक्षण राहणार आहे, तर सर्वसाधारणसाठी दोन जागा आरक्षित राहणार आहेत.3महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या पाच लाख नऊ हजार ९०१ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ३७ हजार ९२३ आहे, तर १२ हजार ७२७ एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे. तेथे अनुसूचित जमातीसाठी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागांचे आरक्षण राहणार आहे, तर सर्वसाधारणसाठी तीन जागा आरक्षित राहणार आहेत.4जिल्हा नियोजन समितीवर ३२ सदस्य निवडून दिल्यावर दोन अन्य सदस्य असे पाहिजेत ज्यांना नियोजन समितीचे ज्ञान आहे. तसेच अन्य १२ सदस्य पालकमंत्री हे नामनिर्देशित करतात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची एकूण संख्याही ४६ होते.