शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये कुत्र्याचा आठ जणांना चावा; भटक्या कुत्र्यांची पुन्हा दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:18 IST

दीड वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश

पनवेल : गेल्या वर्षी ऐन दिवाळीत भटक्या कुत्र्यांनी तीस जणांना चावा घेतल्याची खळबळजनक घटना घडली होती. त्यानंतर पनवेलकरांनी कुत्र्यांची धास्ती घेतली होती. शनिवारी पुन्हा एका भटक्या कुत्र्यांने आठ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. यात एक दीड वर्षाचा चिमुकला जखमी झाली आहे. पनवेलमधील तक्का गावात ही घटना घडली आहे.

पनवेलमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून कुत्र्याचे निर्बीजीकरण झाले नसल्याने कुत्र्यांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. महापालिकेमार्फत कुत्र्याच्या निर्बीजीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घालणे गरजेचे आहे.

तक्कामधील पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी आठ जणांवर हल्ला केला. यात दीड वर्षीय अमरान पटेल या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. या व्यतिरिक्त मुंगळ मुंडा या महिलेच्या हाताला सुध्दा या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यानंतर अवघ्या आठ दिवसानंतर पनवेल रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का परिसरात भटक्या कुत्र्याने सात जणांचा चावा घेतल्याची घटना घडली होती. लागोपाठ घडणाºया या घटनांमुळे पनवेलकरांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिकेकडे याबाबत कोणतीच यंत्रणा नसल्याने हा त्रास वाढत चालला आहे.

पालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला पाच हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्रे आहेत. शनिवारच्या घटनेने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.महापालिकेच्या स्थापणेअगोदर सिडकोच्या माध्यमातून पोदी येथे कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र चालविले जात होते. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. या एजन्सीच्या माध्यमातून शहरातील तब्बल दहा हजार मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने ही सेवा हस्तांतरित केली आहे. तेव्हापासून श्वान निर्बीजीकरण यंत्रणा बंद पडली होती. मात्र गेल्या वर्षी दिवाळीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अलिकडेच स्वत:चे श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू केल्याचे समजते.चार महिन्यात ५५ जणांना चावापनवेमधील मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मागील चार महिन्यात शहरात कुत्रे चावल्याच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे यात महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.