शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको वसाहतीत लवकरच ई - टॉयलेट

By admin | Updated: June 1, 2016 03:01 IST

स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनही बऱ्यापैकी जागृत झाली आहे. सिडको वसाहतीत सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याबरोबर ई- टॉयलेट संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे

कळंबोली : स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनही बऱ्यापैकी जागृत झाली आहे. सिडको वसाहतीत सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याबरोबर ई- टॉयलेट संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबोली आणि कामोठे वसाहतीबरोबर सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांकरिता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध करून त्यानंतर त्वरित ई -टॉयलेट बसविण्यात येतील, अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.सिडको नोडचा विकास झाल्याने दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे, विशेषकरून वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, गटार या सुविधा पुरविण्यात आल्या असल्या तरी सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालयाची बोंब आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सिडको नोडमध्ये स्वच्छतागृह आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. याबाबत नवीन पनवेल येथे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करावे लागले. राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते आनंद भंडारी यांनी तर उपोषण सुद्धा केले. इतर राजकीय पक्षांनी अर्ज आणि विनंत्या सुध्दा केल्या तरी याबाबत कार्यवाही झाली नाही. कळंबोली आणि कामोठे वसाहतीतील परिस्थिती फारशी वेगळी नाही. परंतु राज्य व केंद्र शासनाने हाती घेतलेले स्वच्छता अभियानात सिडकोने प्रभावीपणे काम करण्याचा निर्णय घेतला. कळंबोली आणि कामोठे नोडची जबाबदारी असलेले अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी सुध्दा सार्वजनिक शौचालयाची गरज असल्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. या दोनही नोडमधील स्वच्छतेवर सिडकोचे गेल्या एक दीड वर्षापासून विशेष लक्ष आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण आणि अतिरिक्त मुख्य अभियंता बिजेश शर्मा या अधिकाऱ्यांनी ई-टॉयलेट ही राबविण्याकरिता पुढाकार घेतला. त्यानुसार कळंबोली आणि कामोठे वसाहतीतील नागरिकांकरिता ई टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. दोन ही वसाहतीत पादचारी, फेरीवाली, रिक्षावाले, त्याचबरोबर दिवसभर रस्त्यावर काम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांना शौचालयाची व्यवस्था नसल्याने मोठी कुंचबणा होत होती. सात ई-टॉयलेट उभारणारकळंबोली आणि कामोठे वसाहतीत प्रत्येकी दोन म्हणजे चार टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एक कळंबोली सिडको कार्यालयात बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली आणि कामोठे येथील बसथांब्यालगत टॉयलेट बांधण्यात येणार आहे. याकरिता ५०.३६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा पध्दतीने एजन्सीने नियुक्त करण्यात येणार आहे.