शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘इप्का’चे सांडपाणी थेट नाल्यात

By admin | Updated: May 31, 2016 03:12 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या आजही छुप्या पद्धतीने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट नाल्यात सोडण्याचे काम करत आहेत

दासगांव : महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या आजही छुप्या पद्धतीने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट नाल्यात सोडण्याचे काम करत आहेत. अशाच प्रकारे येथील इप्का लॅबोरेटरीज या फार्मास्युटिकल कंपनीने आपले सांडपाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडले आहे. हायड्रंट टेस्ट करताना हे पाणी बाहेर गेल्याचे कंपनीचे म्हणणे असले तरी अशाच प्रकारे नाल्यात पाणी सोडल्याची ही घटना काही नवीन नाही. वर्षभरातून अनेकदा अशा छुप्या पद्धतीने इप्का कंपनी नाल्यात सांडपाणी सोडते असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाची समस्या गेली अनेक वर्षे कायम आहे. महाड औद्योगिक वसाहतीचे पूर्वीचे रूप आणि आजचे स्वरूप यात बराच बदल झाला असला तरी अनेक छोट्या कंपन्या आपले पाणी आजही थेट नाल्यात किंवा कारखान्याशेजारच्या गटारात सोडत आहेत. पावसाळ्यात तर हा प्रकार सर्रास होतो. महाड औद्योगिक वसाहतीमधील इप्का लॅबोरेटरीज या कंपनीच्या शेजारील कोरड्या नाल्यात काही दिवसांपासून लाल, निळ्या रंगाचे पाणी दिसू लागले आहे. रसायनमिश्रित हे पाणी डबक्यात साचले असले तरी पहिल्याच पावसात हे घातक सांडपाणी थेट नदीला जावून मिळणार आहे. याचा त्रास जलचर प्राणी आणि माणसाला होणार आहे. मात्र याचे काही एक सोयरसुतक कंपनींना नाही.इप्का कारखान्याच्या मागील नाल्यात सांडपाणी सोडण्याचा काही नवा प्रकार नसून प्रतिवर्षी कंपनी या ना त्या कारणाने या नाल्यात पाणी सोडून देण्याचे काम करतच आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील कंपनीला दोन नोटिसा बजावल्या आहेत. मात्र नोटिसीव्यतिरिक्त कोणतीच कारवाई होत नसल्याने कंपनीने पुन्हा अशाच प्रकारे पाणी सोडण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे. आज चोरी पकडली गेल्यानंतर कंपनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी हायड्रंट टेस्टकरिता पाणी सोडल्याचे कबूल केले आहे. यामुळे कंपनीने आपली चुकी अप्रत्यक्षरीत्या मान्य केली आहे. (वार्ताहर)