शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या रणांगणात सुशिक्षित चेहरे

By admin | Updated: May 8, 2017 06:34 IST

पनवेल महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण चेहरे उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे या महापालिकेत पहिल्यांदाच त्या

अरूणकुमार मेहत्रे/ लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण चेहरे उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे या महापालिकेत पहिल्यांदाच त्या त्या प्रभागाचे यंगस्टर नेतृत्व करणार आहेत. त्यातही उच्चशिक्षित नावांवर बऱ्याच ठिकाणी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वकील आणि डॉक्टरांची संख्या बऱ्यापैकी आहे. इंजिनीअरही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.महापालिका क्षेत्रात नागरी वसाहती जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी चाळीच्या आतमधील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर सुशिक्षित मध्यमवर्गीयही बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व करणारेसुद्धा तरुण व उच्चशिक्षित असावेत, अशी अपेक्षा केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी शोध मोहीम आगोदरच सुरू केली होती. तरुण आणि सुशिक्षित उमेदवाराला अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षांमधून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक-१७ मध्ये २० वर्षे नगरसेवक राहिलेले संदीप पाटील नेतृत्व करीत आहेत. ते इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहेत. त्यांच्या पॅनेलमधून राष्ट्रवादीच्या शिवानी सुनील घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे . सुनील घरत यांची कन्या असलेल्या शिवानी हिने बीएमएस केले आहे. याच प्रभागातून संदीप पाटील यांच्याविरोधात अ‍ॅड. मनोज भुजबळ यांना भाजपाने तिकीट दिले आहे. भुजबळ पनवेल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तसेच पक्षाने शेवटच्या क्षणी अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. व्यवसायाने वकील असलेल्या वृषाली यांच्यामुळे पॅनलला ताकद मिळाली आहे. प्रभाग क्रमांक-१६मधून भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर असलेल्या डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्र मांक -१६मध्ये काँग्रेसकडून श्याम म्हात्रे यांची कन्या श्रृती म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या व्यवसायाने वास्तुविशारद आहेत येथूनच शिवसेनेने अ‍ॅड. शुभांगी शेलार यांना संधी देण्यात आली आहे. याच ठिकाणी सर्वसाधारण गटातून मनसेचे अ‍ॅड. संतोष सरगर निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांनी प्रभाग क्र मांक १८मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. शेकापच्या वतीने डॉ. सुरेखा मोहकर यांना तिकिट देण्यात आले आहे. प्रभाग आठ मधून रोडपाली कळंबोली विकास आघाडीतून संधी देण्यात आलेले रोहन पाटील इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. याच आघाडीच्या वतीने प्रभाग सातमध्ये रेवती बैजू या तरुणीला उमेदवारी देण्यात आली आहे. रेवती अ‍ॅडव्हरटायझिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशनचे पदवीत्तर शिक्षण घेत आहेत. सायबर सिटीत ३२ वर्षांच्या नेत्रा किरण पाटील या सुशिक्षित आणि तरुण उमेदवार म्हणून परिचित आहेत. पाटील यांना बँकिंग क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे. कामोठे वसाहतीतील प्रभाग-१३मधून डॉक्टर अरुणकुमार भगत यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक ११मधून डॉक्टर अनिकेत अवारे यांच्या मातोश्री सुनंदा अवारे यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले आहे. सुनंदा अवारे याही पदवीधर आहेत. प्रभाग-१९मधून मनसेकडून अ‍ॅड. केदार सोमण निवडणूक लढवत आहेत.