शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पर्यटन स्थळाला लागले वाहतूककोंडीचे ग्रहण

By admin | Updated: March 16, 2017 03:13 IST

अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा या गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारकडून

अभय आपटे, रेवदंडाअलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा या गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारकडून या गावांचा पाहिजे तसा विकास न झाल्याने येथील पर्यटनावर त्याचा परिणाम होत आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी ही येथील गंभीर समस्या आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, आगरकोट नावाचा वैभवशाली किल्ला, रशियन पहिला प्रवासी भारतात ज्या बंदरात उतरला त्या अफसानी निकितीनचे स्मारक चौल येथे आहे. एकेकाळचे श्रीमंत बंदर म्हणूनही चौल आजही परिचित आहे. ३६० मंदिरे आणि तितकेच तलाव, पुरातन वास्तू, कृषी उत्पादने आणि राजकोटसारखा पुरातन किल्ला, नारळी पोफळीच्या डौलदार बागा, आदी निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. अलिबाग शहरापासून सुमारे सतरा कि.मी. अंतरावर असलेल्या रेवदंडा गावाला एकच मुख्य रस्ता असून पुढे कुंडलिका खाडी आहे. १९८५ च्या सुमारास कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि रोह्यासारखा औद्योगिक वसाहत असलेल्या व प्रति गोवा मानल्या गेलेल्या मुरुड-जंजिरा तालुक्याला अलिबाग जोडले गेले. मात्र अरुंद रस्त्यामुळे रेवदंडा गावात कायम वाहतूककोंडीची समस्या भेडसावते. त्यामुळे स्थानिकांबरोबरच पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.अलिबाग ते रेवदंडा रस्ता म्हणजे या भागातील जीवनवाहिनी म्हटले जाते. मुरुड-जंजिऱ्याला बारमाही पर्यटकांचा राबता असल्याने हा रस्त्यावरही कायम वर्दळ असते. मात्र आपत्काळात, अथवा अपघात घडल्यास जीवनवाहिनी ठप्प होते. काही वर्षांपूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन रस्त्या रुंदीकरणाकडे लक्ष वेधले होते. पण संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. आक्षी गावापासून ते रेवदंडा आगरकोट हा प्रवास सर्वच वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पर्यटक वाहनांसाठीही रस्ता असुरक्षित बनला आहे. खड्ड्यांचे साम्राज्य, अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, सूचना फलकांचा अभाव आदींमुळे पर्यटक याठिकाणी येण्याचे टाळतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पर्यटनावरही परिणाम झाला आहे. एसटी, व्होल्वोसारख्या खासगी वाहनांतून जाणारे प्रवासीही जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, तर काही पर्यटक कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र परतीच्या प्रवासाला रोहा मार्ग निवडतात.