शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
2
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
3
'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क हॉगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
4
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
5
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
6
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
7
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
8
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
9
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
10
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
11
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
12
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
13
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी
14
धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय
15
मक्का मशीद आणि अजमेर ब्लास्ट प्रकरणात का केले नाही अपील? सरकारवर एवढे का भडकले ओवेसी?
16
आता भगतसिंगगिरी सुरु, कुठल्याही क्षणी मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
17
अंड्यामुळे ८० विद्यार्थ्यांनी दिली शाळा सोडायची धमकी, अखेर मंत्र्यांना बोलवावी लागली बैठक
18
Shravan 2025: 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा' यांसारख्या पावसाळी गीतांनी द्या श्रावण मासाच्या शुभेच्छा
19
"ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर मी एकटा पडलो...", असं का म्हणाला गौरव मोरे?
20
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; PM मोदींनी सांगितले फायदे, म्हणाले...

मोगऱ्यातून वर्षाला ६ लाखांची कमाई

By admin | Updated: September 30, 2015 00:06 IST

शहापूर तालुक्यातील नेवरे बराडपाडा येथील आदीवासी शेतकरी कैलास राघो बराड यांनी दोन एकर शेतीत मोगऱ्याची लागवड करून वार्षिक ६ लाख रुपये मिळविले आहेत.

जनार्दन भेरे, भातसानगरत्यांच्यासह मुलांना ना नोकरी ना परवडणारा पुढला व्यवसाय. केवळ दिवसभर जंगलात फिरायचे असा त्यांचा दिनक्रम होता. मात्र आपल्या जागेत आपण फुलझाडे लावली तर ....अशी कल्पना त्यांच्या मनात मात्र सतत रहायची. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते भिवंडी येथे रंगरंगोटीचे काम करण्यासाठी एक महिना गेले. दिवसरात्र काम करून २० हजार रुपये महिना मिळविल्यानंतर त्यांनी मोगऱ्याची ३ हजार रोपे खरेदी केली. हाकेच्या अंतरावरील तानसा नदीचे पाणी शेतात घेण्यासाठी पंचायत समिती, शहापूर येथील कृषी विभाग गाठून तेथील कृषी अधिकारी एस.मंगाळे, विलास झुंजारराव, सचिन गंगावणे, पूनम कान यांनी त्या शेतकऱ्यांना सर्वतोपरीने मदत करून आदिवासी उपयोजनेतून इंजिन, पाईप, स्प्रेपंप फवारणी औषधे व मार्गदर्शन केले. अहोरात्र मेहनत करून आज प्रतीदिवशी ३० किलो मोगरा विक्रीसाठी जातो. प्रतिकिलोस १८०० ते २ हजार रुपये भाव मिळाल्याचे बराड यांनी सांगितले.वर्षभरातून केवळ जुलै महिन्यात फांद्या कटींग होत असल्याने फुलांचे उत्पादन घेत नाही. अन्यत्र वर्षभर देणारे उत्पादन असल्याने आता नोकरीची आवश्यकता नसल्याचे हे कुटुंब सांगते. त्यांना या व्यवसायात त्यांची पत्नी गुलाब, मुले दशरथ, संजय, मुलगी संगिता मदत करतात. त्यामुळे उत्पन्न घेण्याची उमेद त्यांच्या दुपटीने वाढली आहे. रोपवाटीका तयार करून २० ते २५ हजार रुपये इतके उत्पन्नही ते दरवर्षी मिळवितात.