शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी लवकर या...

By admin | Updated: September 11, 2016 02:34 IST

ढोल ताशांच्या गजरात आणि बॅन्जोच्या तालावर शनिवारी भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. रायगड जिल्ह्यातील ९७ सार्वजनिक आणि ५६ हजार ६४४ घरगुती गौरी-गणेशमुर्तींचे यावेळी विसर्जन करण्यात आले.

अलिबाग : ढोल ताशांच्या गजरात आणि बॅन्जोच्या तालावर शनिवारी भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. रायगड जिल्ह्यातील ९७ सार्वजनिक आणि ५६ हजार ६४४ घरगुती गौरी-गणेशमुर्तींचे यावेळी विसर्जन करण्यात आले. सायंकाळी चार वाजल्यापासून गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची पावले समुद्र किनारी, नदी, तलावाकडे निघाली होती. सहा वाजल्यानंतर शहरात मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुका निघाल्याने रस्ते आणि विसर्जन ठिकाणांना जत्रेचे स्वरुप आले होते. आबाल वृध्दांनी बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये गर्दी केली होती. ढोलताशासह डॉल्बीच्या दणदणाटावर तरुणाईची पावले थिरकत होती. काही ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरात, भजन-भक्तीगीते गात गणरायाची मिरवणूक काढण्यात आल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. गणरायासह गौराईची मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केल्याचे दिसून आले.फुले-तोरणांनी सजवण्यात आलेल्या रिक्षा, कार, टेम्पो, ट्रक अशा लहानमोठ्या वाहनांमधून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती. कोळी आणि आगरी समाजातील महिलांनी एकाच रंगाचा पोशाख परिधान ऐक्याचा प्रत्यय आणून दिला. युवा वर्गांने पारंपारीक पोशाख परिधान करुन लोप पावत चाललेल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.समुद्र किनारी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल दुपारपासूनच सजले होते. तेथे मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे दिसून आले. अलिबाग नगरपालिकेने खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणूक मार्गावर विजेची सोय केली होती. काही सामाजिक संस्थांनी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. विसर्जन मिरवणूकीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी जागोजागो फलक लावले होते. एकेरी वाहतुकीवर विशेष भर दिला होता. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.आनंदपर्वाचा मध्यांतर पेण : पेणच्या भोगावती नदी तटावर गौराईसह बाप्पांना भावभक्तीमय वातावणात निरोप देण्यात आल्याने आनंदपर्वाचा मध्यांतर झाला आहे. पेणमधे ६५०० गणेशमूर्तीच विर्सजन झाले. सगळीकडे मिरवणूका व टाळमृदुंगासह ढोलताशाच्या गजरात नाचत बाप्पांच्या विर्सजन मिरवणूकानी सर्वत्र गणपती बाप्पा मोरया च्या निनादाने उत्साह ओसंडुन वाहत होता. अखेर शेवटची आरती होऊन बाप्पांना निरोप देण्यात आला.भजन, वादनाच्या तालावर निरोपमोहोपाडा : रसायनी व आसपासच्या ग्रामीण भागातील गौरी गणपतीचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्तांचे मन हळहळत होते. दुपारी तीन वाजल्यापासून मोहोपाडा तलाव, रिस पुल, कांबा पुल, पाताळगंगा नदी, वावेघर घाट, गुळसुंदे, वाशिवली, लोहोप, कासप, तळेगाववाडी आदी ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आले. ढोल ताशे, टाळ मृदूंगाच्या गजरात भक्तगणांनी बाप्पाला निरोप दिला. मोहोपाडा तलावावर २४५, कांबे पुल - ४३, रिसपुल - १६४, पाताळगंगा - १३५, वावेघर -४३, गुळसूंदे-१२४, कासप-१४३, लोहोप-१७८, तळेगाववाडी-८७ गणपती व सुमारे ३०० गौरार्इंना भावपुर्ण निरोप देण्यात आला. रसायनी पोलिसांनीही विसर्जन स्थळी चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.रोह्यात विसर्जन स्थळावर साफसफाईरोहा : तालुक्यात ढोल ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तांनी ११८८ बाप्पांसह, ९१६ गौरार्इंचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले. यावेळी शहरातील विसर्जन स्थळावर मोठी गर्दी झाली होती. रोहा नगरपालिकेतर्फेविसर्जन स्थळांवर साफसफाई, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. गुलाल उधळत, लेझीम, टाळ-मृदुंग, ढोल - ताशाच्या गजरात, आणि डिजेच्या तालांवर गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती. एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदी किनारी निघाले होते. हातगाडी तसेच खाजगी वाहनांनी विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांना पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर जनसमुदाय लोटला होता. गर्दीच्या नियोजनासाठी रोहा पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती. नगरपालिकेकडून विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. वीज, पाणी, निर्माल्य कलश याची व्यवस्था चारही विसर्जन स्थळी करण्यात आली आहे.