शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा, ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 03:27 IST

महापालिका शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांना अत्याधुिनक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ५६ शाळांमधील तब्बल ६०० वर्गखोल्या व्हर्च्युअल क्लासरूम स्वरूपात रूपांतरित केल्या जात असून, शहरातील तीन शाळांना भेटी देऊन आयुक्तांनी तेथील सुविधांची पाहणी केली.

नवी मुंबई : महापालिका शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांना अत्याधुिनक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ५६ शाळांमधील तब्बल ६०० वर्गखोल्या व्हर्च्युअल क्लासरूम स्वरूपात रूपांतरित केल्या जात असून, शहरातील तीन शाळांना भेटी देऊन आयुक्तांनी तेथील सुविधांची पाहणी केली.महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक शाळेमध्ये पटसंख्येनुसार संगणक उपलब्ध करून दिले जात आहेत. अत्याधुनिक स्वरूपात कॉम्प्युटर लॅब तयार केली जात आहे. कोपरखैरणे सेक्टर ५मधून मनपा शाळा क्रमांक ३५ व ७२मध्ये प्रायोगिक स्वरूपात लॅब उभारण्यात आली असून, आयुक्त रामास्वामी एन. यांनी पाहणी केली. दिवाळे येथील मनपा शाळेलाही आयुक्तांनी भेट देऊन स्मार्ट बोर्डची पाहणी केली व अभ्यासक्रमाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. सीबीडी सेक्टर ८मधील मनपा शाळेला भेट देऊन सीएसआरमधून उभारण्यात आलेल्या कॉम्प्युटर लॅबचीही पाहणी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, शिक्षण अधिकारीसंदीप संगवे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, संजय देसाई उपस्थित होते.आधुनिक माहिती तंत्रयुगाला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी स्मार्ट असावेत, या दृष्टीने ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मनपाच्या शाळांमधील ६०० वर्गखोल्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये रूपांतर करणारी व प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई पहिली महापालिका ठरणार असल्याची माहिती आयुक्तांनी या वेळी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई