शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये घाणीचे ढिगारे

By admin | Updated: June 14, 2016 01:32 IST

सिडकोच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून परिसरातील कचरा उचलण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस खारघरमधील कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे.

पनवेल : सिडकोच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून परिसरातील कचरा उचलण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस खारघरमधील कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. तीन ते चार दिवस कचरा उचलला न गेल्याने खारघरमधील काही भागांत कचऱ्याचे ढीग पडलेला दिसतात. त्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे. बुर्बी गावालगत असलेल्या सेक्टर १९ वसाहत परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहे. या ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्याचे काही रहिवासी रस्त्यावर कचरा टाकत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे कचरा सडत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत रहिवाशांकडून वारंवार तक्रार करण्यात आली असली तरी सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. यासंदर्भात सिडकोचे कचरा व्यवस्थापन अधिकारी के. बिर्मोडे यांच्याशी संपर्क साधला असता पाहणी करून त्वरित कचरा उचलला जाईल, असे त्यांनी सांगितले.