शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

अमृत महोत्सवी वर्षात कोकणात फुलविली २७ हेक्टरवर वनराई; वन विभागाचे अभियान

By कमलाकर कांबळे | Updated: December 27, 2023 21:00 IST

एक लाख ३४ हजार ४९० झाडांची लागवड

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वन विभागाने कोकण विभागातील २७.४५ हेक्टर जागेवर वनराई फुलविली आहे. याअंतर्गत २०२३-२४ या वर्षात एक लाख ३४ हजार ४९० झाडांची लागवड करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

वृक्षसंवर्धन आणि वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत बेलवन, अमृतवन, पंचायतवन आणि मियावाकी वननिर्मितीचे काम हाती घेतले होते. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना वन विभागामार्फत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ‘बेलवन’ उद्यानांची निर्मिती केली आहे. बेल वृक्षाची पाने, मुळे, फळे व सालीचा उपयोग व्हावा, हा यामागचा उद्देश होता. या बेलवनातून धार्मिक स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती अर्थात बेल, सीता अशोक, रुद्राक्ष, बोर, पळस, पारिजात, पांढरा चाफा, पांढरी कण्हेर या वृक्षांचा उपयोग होणार आहे.

अमृतवन, पंचायत वनाची निर्मितीकोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण २.६० हेक्टर क्षेत्रावर एकूण एक हजार ४० बेल व इतर वृक्षांची लागवड केली आहे. कोकण विभागातील ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील एकूण ३ हेक्टर क्षेत्रावर एकूण एक हजार २०० वृक्षांची लागवड करून अमृत वन तयार केले आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १७.५० क्षेत्रावर एकूण एक हजार ७५० वृक्षांची लागवड करून पंचायत वन तयार करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई