शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दुर्गोत्सवाला बसणार महागाईची झळ !

By admin | Updated: October 5, 2015 00:58 IST

नवरात्रोत्सवाला अवघा आठवडाभराचा अवधी उरलेला असताना शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांत धामधूम सुरू झाली आहे. शहरात विविध भागातील मूर्तिकार

प्राची सोनवणे, नवी मुंबईनवरात्रोत्सवाला अवघा आठवडाभराचा अवधी उरलेला असताना शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांत धामधूम सुरू झाली आहे. शहरात विविध भागातील मूर्तिकार दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. एकीकडे महागाईने आधीच नागरिक त्रस्त झालेले असताना यावर्षी दुर्गादेवीच्या मूर्तींच्या किमतीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती घडविताना लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ झाल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.साधारणत: विघ्नहर्त्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी सुरुवात केली जाते. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुर्गादेवीच्या मूर्तींचे भाव २५टक्क्यांनी वाढले आहेत. देवीची मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, सुतळी, लाकूड, आभूषणे, रंग, तणस आदी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी २००० रु पयांपासून १६०० हजार रु पयांपर्यंत दुर्गादेवीच्या मूर्ती विक्र ीला आहेत. गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जेवढी मेहनत लागत नाही त्यांच्या दुपटीने मेहनत व वेळ दुर्गा देवीची मूर्ती घडविण्यासाठी लागतो. दुर्गादेवीला आभूषणे बरीच चढविली जातात. मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विदर्भात सावनेर, खापरखेडा, उमरेड, भंडारा, यवतमाळ या ठिकाणाहून मूर्तीची मागणी आहे. शहरात अनेक ठिकाणी दुर्गा उत्सव साजरा केला जातो. दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जागा बरीच लागत असल्यामुळे जेवढी मागणी तेवढ्याच मूर्ती तयार केल्या जातात, अशी माहिती सीवूड्स -दारावे येथील सायली कला केंद्रातील मूर्तिकार जनार्दन नाईक यांनी दिली. मूर्तीचे साचे बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीसाठी मूर्तिकारांना खिशातून १८० ते २२० रुपये खर्च करावे लागत असल्याची माहिती नाईक यांनी दिली. अप्रत्यक्षपणे या साऱ्याचा ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड पडणार असल्याचे पहायला मिळते. पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिप्समची गोणी ३०० ते ३५० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. तसेच काबोलच्या एका बंडलची किंमत ८५० ते ९०० च्या घरात पोहोचली आहे. ग्राहकांची नैसर्गिक रंगांना असलेल्या पसंतीमुळे इतर रंगाच्या तुलनेत या रंगाच्या दरातही वाढ झाली आहे.