शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : डम्पिंग ग्राउंडचा विषय पेटणार, लोकप्रतिनिधी आक्रमक : स्थायी समितीचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:00 IST

तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या विषयावरून लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. शासनाकडून तत्काळ जमीन हस्तांतर करून घ्यावी. योग्य मार्ग निघाला नाही, तर पुढील स्थायी समितीची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबई : तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या विषयावरून लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. शासनाकडून तत्काळ जमीन हस्तांतर करून घ्यावी. योग्य मार्ग निघाला नाही, तर पुढील स्थायी समितीची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे. कचºयाची टेकडी तयार होऊ लागली आहे. कचºयामुळे तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी पसरू लागली आहे. येथील रहिवासी व शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाने नवीन जमीन देण्यासाठी पैशांची मागणी केली असल्यामुळे जमीन हस्तांतरण रखडले आहे. या विषयाचे पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी प्रशासनास धारेवर धरले.डम्पिंग ग्राउंडची क्षमता व मुदत संपली आहे. कचºयाचे ढिगारे उभे केले जात आहेत. आम्ही एक वर्षापासून सेल बंद करण्याची मागणी करत आहोत; परंतु प्रशासन दुर्लक्ष करत आहे. राज्य शासनाकडेही पाठपुरावा केला आहे; पण पालिकेने स्मार्ट सिटीसाठी केलेल्या विरोधामुळे शासनाकडून सहकार्य होत नाही. जमिनीसाठी पैशांची मागणी केली जात आहे. महापालिका श्रीमंत आहे. यामुळे वेळ पडल्यास शासनाकडे पैसे भरून जमीन ताब्यात घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. महानगरपालिका प्रशासनाने एक आठवड्यात ठोस निर्णय घ्यावा. डम्पिंग ग्राउंडचा विषय सोडविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पुढील आठवड्यात स्थायी समितीची बैठक चालू देणार नसल्याचा इशाराही सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे. यामुळे पुढील काळात कचºयाचा प्रश्न पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका