शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावर कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:17 IST

पावसाने दडी मारल्याने सायन-पनवेल मार्गावर ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे सुरु असतानाच पुन्हा पावसाने हजेरी लावली.

नवी मुुंबई : पावसाने दडी मारल्याने सायन-पनवेल मार्गावर ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे सुरु असतानाच पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे दुरुस्तीकामात अडथळा होवून परिस्थिती पूर्ववत झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. उरण फाटा व तुर्भे येथे खड्ड्यांमुळे पुन्हा काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याची संधी साधत सायन-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास होत असून अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्याठिकाणी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत.पाऊस थांबल्यानंतर ठेकेदारांकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. अशातच सोमवारी पुन्हा पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बुजवलेले खड्डे पुन्हा वर आले आहेत. यामुळे सायन-पनवेल मार्गावर सानपाडा ते तुर्भे दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. त्याशिवाय उरणफाटा येथे देखील वाहतुकीला अडथळा होवून वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.त्याशिवाय पावसाच्या पुनरागमनामुळे कोपरखैरणे, घणसोली दरम्यान दर्गालगत, कोपरी नाका व इतर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी तारेवरची कसरत करत चालकांना वाहने चालवावी लागत आहेत.