शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेतील तणाव निवळला, परिस्थिती पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 05:12 IST

सुरक्षेच्या कारणास्तव नवी मुंबईतील मोबाइल इंटरनेट सेवा बंद, पोलीस फौजफाटा तैनात

नवी मुंबई : मराठा मोर्चाने बुधवारी पुकारलेल्या आंदोलनामुळे कोपरखैरणे परिसरात निर्माण झालेली परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.गुरुवारी सकाळी कोपरखैरणेतील शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत बुधवारच्या घटनेचा निषेध करण्यात आला; तसेच नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतरही वाहनांची व मालमत्तेची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांनी या वेळी दिली. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने बुधवारी मध्यरात्रीपासून शहरातील मोबाइल नेटवर्क बंद ठेवण्यात आले होते. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई मरोळ येथील ३०० पोलिसांची फौज कोपरखैरणे परिसरात तैनात करण्यात आली आहे.मराठा आरक्षणासाठी बुधवारी पुकारलेल्या बंद आंदोलनाला कळंबोली आणि कोपरखैरणे परिसरात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची मोडतोड केली. विशेष म्हणजे आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतरसुद्धा कोपरखैरणेत तणाव होता. आंदोलकांनी येथील डी मार्ट चौकात पोलीस चौकी पेटवून दिली,तीन वाहनांना आग लावली. तीन टाकीजवळील हॉटेल्स व निवासी घरांवर तुफान दगडफेक केली. शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या घरावरही दगडफेक करून मोडतोड केली. त्यांच्या वाहनांची नासधूस केली. कोपरखैरणेतील लहान-मोठ्या सुमारे शंभर वाहनांची मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणली. तरीही तणाव कायम होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवराम पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला परिस्थितीचा आढावा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा करून घटनेचा आढावा घेतला, तसेच जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर का गेली, याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाईची सूचना आयुक्तांना दिल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानुसार गुरुवारी पहाटे आयजी दर्जाचे दोन अधिकारी व उपायुक्त दर्जाचे दोन अधिकारी, असे चार अधिकारी नवी मुंबई आयुक्तालयात बाहेरून तपासाकरिता नेमण्यात आले आहेत.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNavi Mumbaiनवी मुंबई