शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत मैदाने नसल्याने क्र ीडा क्षेत्राला खीळ

By admin | Updated: February 8, 2016 02:46 IST

खोपोलीतील युवकांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असला तरी क्र ीडा क्षेत्रात मात्र त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही.

खालापूर : खोपोलीतील युवकांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असला तरी क्र ीडा क्षेत्रात मात्र त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. शहरात खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने अनेकांना सरावही करता येत नाही. जनता विद्यालय व कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलचे क्र ीडांगण हे दोनच पर्याय सध्या खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. गुणवत्ता असतानाही पुरेशी मैदाने व सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडू आजही संधीची वाट पाहात आहेत. खोपोलीतील सत्ताधाऱ्यांना मात्र याचे सोयरसुतक नसल्याने शहरातील क्र ीडा क्षेत्रालाच खीळ बसली आहे. खोपोली नगरपालिकेच्या विकास आराखड्यात स्टेडियम आणि क्रीडांगणासाठीचे आरक्षण आहे. मात्र याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याने खेळाडूंच्या अनेक पिढ्या नष्ट झाल्या आहेत. विविध स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू आणि हौशी खेळाडूंना सरावासाठी क्रीडांगण हवे, यासाठी २००३ ला तत्कालीन नगराध्यक्ष रामदास शेंडे यांच्यासह मारुती आडकर, अविनाश तावडे, शंकर दळवी, गुरुनाथ साठेलकर आदींनी पाठपुरावा करून जिल्हा क्रीडा खात्याकडून हाळ परिसरात क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव नगरपालिका सभागृहात मंजूर करून घेतला होता. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी नगरपालिकेच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देत क्र ीडा संकुलासाठी सिल्वर पॅकेजनुसार सुमारे ७५ लाख रुपयाचा निधीही मंजूर केला होता. रामदास शेंडे पायउतार झाल्यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी त्या मंजूर पॅकेजच्या रकमेतून या क्षेत्रात फक्त भराव आणि संरक्षक भिंत बांधण्यापलीकडे काहीही केले नाही. अर्धवट अवस्थेत असलेल्या संरक्षक भिंतीचा सांगाडा आणि माजलेले रान मैदानावर सध्या पाहायला मिळते.खोपोलीतील क्रीडाप्रेमींना आपली हौस भागविण्यासाठी जनता विद्यालयाच्या क्रीडांगणाचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक खेळाडू जमेल त्या ठिकाणी सराव करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. खोपोलीत तरण तलावही नसल्याने अनेक जलतरणपटू या एज्युकेशन सोसायटी, रिशीवन किंवा यूके रिसॉर्टसारख्या ठिकाणी खिशाला अधिकचा भुर्दंड सोसून सराव करताना दिसतात.क्रिकेट आणि फुटबॉलप्रेमी कोणत्याही मोकळ्या जागेवर तात्पूरते क्रीडांगण तयार करून खेळतात. याच तात्पुरत्या क्र ीडांगणावर क्रि केट व फुटबॉलच्या स्पर्धाही भरविल्या जातात.