शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सोयी-सुविधांअभावी कामोठेतील टपाल कार्यालयाला घरघर

By admin | Updated: March 30, 2016 01:53 IST

कामोठे वसाहतीत जवाहर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टपाल कार्यालयात सध्या अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अतिशय छोट्या जागेत

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली कामोठे वसाहतीत जवाहर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टपाल कार्यालयात सध्या अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अतिशय छोट्या जागेत या टपाल कार्यालयाचे काम सुरू आहे. पुरेशा सोयी-सुविधांअभावी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी ग्राहकांना नवीन पनवेल येथील टपाल कार्यालयात जावे लागते. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली ही संदेशवहनाची यंत्रणा आजही सुरू आहे. स्वातंत्र्योत्तर काळात टपाल, तार हीच संपर्काची प्रमुख माध्यमे होती. याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्यासाठी मनिआॅर्डरची सुविधा होती, जी आजही प्रचलित आहे. या व्यतिरिक्त महत्त्वाची कागदपत्रे, पार्सल त्वरित पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा उपलब्ध आहे. टपाल सेवेला पर्याय म्हणून अनेक कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही विश्वासार्ह सेवा म्हणून ग्रामीणबरोबरच शहरी भागातही टपाल सेवेलाच प्राधान्य दिले जाते. शासकीय पत्रव्यवहार, पार्सल, महत्त्वाची कागदपत्रे, बिल, पॅन कार्ड, वाहन परवाना, परमीट, पासपोर्ट, बँकांच्या नोटिसा किंवा माहिती पत्र, न्यायालयाच्या नोटिसा, समज, निकालपत्र हे आजही पोस्टानेच पाठवले जाते. जनतेसाठी इतक्या महत्त्वाच्या असलेल्या टपाल सेवेसाठी कामोठे वसाहतीकरिता स्वतंत्र टपाल कार्यालय नसल्याने त्याचा भार जवाहर इंडस्ट्रीजतील कार्यालयावर आहे. टपाल खात्यात पत्रांची आवक-जावक जास्त असते. दररोज जवळपास ५०० हून अधिक टपाल येतात. पत्र, मनिआॅर्डर, रजिस्टर, पार्सल, पॅन कार्ड, टपालाचे वितरण करावे लागते. मात्र कामोठेतील टपाल कार्यालयाची जागा त्यासाठी अपुरी पडते. यासाठी किमान १००० चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. पत्र, कुरिअर, स्पीडपोस्टचे पार्सल ठेवले तर कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेक टपालांचे वितरण थेट नवीन पनवेल येथील मुख्य कार्यालयातून केले जात आहे. पोस्टमनची संख्याही कमी असल्याने सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे अनेकदा टपाल नागरिकांना उशिरा मिळत असल्याच्या तक्र ारी येत आहेत. कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी काम करीत असून त्यांच्यावर सुध्दा कामाचा भार आहे. येथे रजिस्टर पोस्ट, बुक पोस्ट, इंटीमेशन, आरडी बचत आदी कामे होतात. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा उरक होत नाही. टपालाची कागदपत्रे रिक्षाने नवीन पनवेलला पाठवले जातात त्याकरिता पोस्टाची गाडी येत नाही. अतिशय अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयाकडे जाण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे रिक्षा करूनच जावे लागते. रस्ते अतिशय खराब असल्याने रिक्षा सुध्दा तिथे जात नाही. त्यामुळे कित्येक जण कळंबोली किंवा खांदा वसाहतीतील पोस्ट कार्यालयात जावून काम करतात.सिडको जागा देईनाकामोठेकरांची गैरसोय दूर व्हावी,याकरिता वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळावी याकरिता सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अशा कामाकरिता सिडको काही जागा देत नसल्याने टपाल विभाग सुध्दा पाठपुरावा करून थकला आहे. वास्तविक पाहता सिडकोने याकरिता राखीव जागा ठेवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मद्यपींचा अड्डाजवाहर इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयात रहिवासी संकुल नाहीत. आजूबाजूला कारखाने असल्याने येथे कामगारवर्गाचा वावर जास्त आहे. त्यामुळे पोस्ट कार्यालय बंद झाल्यानंतर या ठिकाणी मद्यपी दारू पित असल्याचे आजूबाजूला पडलेल्या रिकाम्या बाटल्यावरून उघड झाले आहे.कामोठे वसाहतीत सेक्टर २0 मध्ये भाडेतत्त्वावर पर्यायी जागा घेण्यात आली आहे. त्याचा करारनामा झाला आहे. लवकरच जवाहर इंडस्ट्रीजचे कार्यालय त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल. त्याचबरोबर सिडकोकडून जागा मिळावी याकरिता पाठपुरावा केला जात आहे.- दीपाली कांबळे, पोस्ट मास्टर, कामोठेजवाहर इंडस्ट्रीजमधील पोस्ट कार्यालयाची स्थिती बिकट आहे. कॉलनीत टपाल कार्यालयासाठी सिडको आणि पोस्टाकडून समन्वय साधणे आवश्यक आहे- धनश्री चव्हाण, रहिवासी.टपाल, मनिआॅर्डर, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्रआदी महत्त्वाची कागदपत्रे टपालानेच येतात. मात्र टपालचे मुख्य कामकाज नवीन पनवेलहून होते. - दादाभाऊ चौधरी, रहिवासी