शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सोसाट्याच्या वा-यामुळे नागरिकांची तारांबळ; महामार्गासह सखल भागात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 02:33 IST

शहरात मंगळवारी दुपारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या जोरदार सरींमुळे नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. वादळी वाºयामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या तर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते.

नवी मुंबई : शहरात मंगळवारी दुपारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या जोरदार सरींमुळे नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या तर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. झोपडपट्टी परिसरातील घरांवरील पत्रे उडाल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाच्या या दमदार हजेरीमुळे सायन-पनवेल महामार्ग, तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.पावसामुळे वातावरणातही बदल झाला आहे. अशा वातावरणामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. पावसाबरोबर सोसाट्याच्या वाºयामुळे हवेत गारवा पसरला आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. महानगरपालिका आपत्कालीन विभाग, तसेच अग्निशमन दलाला मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात आली. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत बेलापूर विभागात ७९.३ मि.मी., नेरुळ विभागात ६६.६ मि.मी., वाशी विभागात ६२.२ मि.मी. आणि ऐरोली विभागात २३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. शहरात सरासरी ५७.९५ मि.मी. पाऊस झाला. महानगरपालिकेच्या वतीने हिवताप, डेंग्यू यासारख्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरिकांनी पाणी साठवून ठेवलेली भांडी रिकामी करावीत, तसेच पावसाचे पाणी साचलेल्या जागेवरील पाण्याचाही निचरा करावा, असे आवाहन केले जात आहे.>विजेचा लपंडावसोसाट्याच्या वाºयासह झालेल्या या पावसामुळे अनेक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे काही भागात वीजवाहिन्या तुटल्या. तसेच काही भागात भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. काही ठिकाणी खबरदारी म्हणून महावितरणच्या वतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.>पनवेलला झोडपलेपनवेल तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. अवघ्या काही तासांत पनवेल शहरात १०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सायन- पनवेल महामार्गावर कळंबोली, खारघर टोल नाक्याजवळ दोन लेन पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने कामावरून परतणाºया नोकरदारांचे हाल झाले. पावसाने उसंत घेतल्याने बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले होते. मात्र पावसाने कामात अडथळा आणल्याने खड्डे जैसे थे राहणार आहेत.>भुयारी मार्ग पाण्यातसानपाडा रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात पाणी साचले असून, आपत्कालीन विभागाच्या वतीने या पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच घणसोली येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाणी साचल्याने गाड्या बंद पडल्याच्या घटना घडल्या असून, यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.>उरणकरांना पावसाने झोडपलेमंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून कोसळणाºया जोरदार पावसाने उरणकरांना झोडपून काढले. पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले असून, उरण शहर आणि परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार कोसळणाºया पावसामुळे आणि खराब हवामानामुळे दुपारनंतर स्पीड बोटीची वाहतूक वगळता भाऊचा धक्का ते मोरा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यानची वाहतूक बंद पडली आहे. याठिकाणी पावसादरम्यान काही तास बत्ती गुल झाली होती. शहरातील वैष्णवी हॉटेल ते कुंभारवाडा, आपला बाजार ते साठे हॉटेल, एनआय हायस्कूल, गणपती चौक आदी रस्त्यावर पाणी जमा झाले होते. ग्रामीण भागातील चिरनेर, भेंडखळ, नवघर, करंजा, केगाव, पागोटे आदी गावात पावसाचे पाणी शिरले होते. जेएनपीटी परिसरातील काही रस्तेही पाण्याखाली गेले होते. उरण परिसरात पावसाच्या दमदार एंट्रीने शहर, गावातील नाले, गटारे तुडुंब भरून वाहू लागले आहे. खराब हवामानामुळे दुपारनंतर स्पीड बोटीची वाहतूक वगळता भाऊचा धक्का ते मोरा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.>अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या सामन्यांकरिता महापालिकेने शहरातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.महामार्गावरील खड्डे बुजविणे तसेच पावसामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.