शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

डेडलाइन अवघ्या काही तासांवर तरी उपाययोजनांची बोंब, वारंवार मुदतवाढ देऊनही पनवेल महापालिकेकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 02:49 IST

महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. तीन वेळा कचरा हस्तांतरण स्वीकारण्यास महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

वैभव गायकर पनवेल : महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. तीन वेळा कचरा हस्तांतरण स्वीकारण्यास महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ मार्च ही अंतिम तारीख आहे. यानंतर सिडको नोडमधील कचरा उचलणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. यामुळे अवघे २४ तासांत पनवेल महापालिकेला कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.पनवेल महापालिकेकडे कचरा हस्तांतरणासाठी सत्ताधारी आग्रही होते. मात्र प्रशासनामार्फत कचरा हस्तांरणाबाबत असमर्थता दर्शवल्याने सत्ताधारी विरुद्ध प्रशासन हा नवा वाद निर्माण झाला होता.पनवेल महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभाग घेतला होता. शहरात सर्वेक्षण सुरू असताना सिडकोने कचरा उचलण्यास नकार दिल्याने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर सिडकोने १५ मार्च ही कचरा उचलण्यासाठी अंतिम तारीख निश्चित केली होती. आता एकच दिवस शिल्लक असताना कचरा हस्तांतरणाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. महिनाभरापूर्वी सिडकोने कचरा व्यवस्थापनाचा भार उचलला म्हणून तब्बल ३ कोटी रुपयांचे बिल महापालिकेला पाठविले होते. या बिलाचा भरणा पालिकेने सिडकोला केला नसल्याने कचरा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. पनवेल महापालिका अखत्यारीत खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा, कामोठे आदी सिडको नोडचा समावेश आहे.पनवेल महापालिकेची स्थापना १ आॅक्टोबर २०१६ मध्ये झाली. महापालिकेच्या निवडणुका होऊनही जवळपास दीड-दोन वर्ष होत आहे. एवढ्या कालावधीत महापालिकेने कचरा प्रश्न हस्तांतरणासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याची गरज होती. आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांत महापालिका कोणत्या उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. यासदंर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता, १५ मार्चनंतर महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कचरा आम्ही उचलणार नाही. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.