शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

सिडकोच्या अडवणुकीमुळे दगडखाणी बंद

By admin | Updated: October 12, 2016 04:56 IST

केंद्र शासनाची २०२६ पर्यंत परवानगी असतानाही सिडको प्रशासनाने केलेल्या अडवणुकीमुळे शहरातील ७२ दगडखाणी बंद झाल्या आहेत. मुदतवाढ मिळविण्यासाठी दीड वर्षांपासून पाठपुरावा

नामदेव मोरे / नवी मुंबई केंद्र शासनाची २०२६ पर्यंत परवानगी असतानाही सिडको प्रशासनाने केलेल्या अडवणुकीमुळे शहरातील ७२ दगडखाणी बंद झाल्या आहेत. मुदतवाढ मिळविण्यासाठी दीड वर्षांपासून पाठपुरावा करूनही सिडकोच्या खणीकर्म व पर्यावरण विभागाने सर्व प्रस्ताव अडगळीत टाकले आहेत. दगडखाणी व बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या स्थानीक प्रकल्पग्रस्तांवर पुन्हा एकदा अन्याय केला आहे. संघर्ष केल्याशिवाय नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांची एकही मागणी कधीच मान्य झालेली नाही. गरजेपोटी बांधलेल्या घरांपासून विद्यावेतनासारख्या मागणीसाठीही सिडकोबरोबर झगडावे लागत आहे. आता दगडखाण चालक मालक व त्यावर अवलंबून असलेल्या बांधकाम साहित्य पुरवठादार भुमीपुत्रांनाही त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी दगड, खडी जवळच उपलब्ध होण्यासाठी एमआयडीसीमधील खाणपट्यांचे प्रकल्पग्रस्तांना वाटप केले आहे. २००७ मध्ये खाणींची मुदत संपल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून २०२६ पर्यंत वाढीव मुदत दिली आहे. या मंजुरीच्या आधारावर सिडकोनेही २० वर्षासाठी वाढीव परवाना देणे आवश्यक होते. पण संचालक मंडळाच्या निर्णयाप्रमाणे दोन टप्यात परवान्याची मुदत निश्चीत करण्यात आली. पण पैसे मात्र पूर्ण २० वर्षासाठीचे घेण्यात आले. पहिल्या टप्यातील मुदत ३० सप्टेंबर २०१६ रोजी संपत असल्यामुळे दगडखाण चालक, मालक संघटनेने २०१४ अखेरपासूनच सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीची मुदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी अशी विनंती केली. वारंवार बैठका घेवून व चर्चा करूनही सिडको प्रशासनाने काहीही निर्णय घेतला नाही. यामुळे मुदत संपल्याने १ आॅक्टोंबरपासून सर्व खाणी बंद कराव्या लागल्या आहेत. केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाची परवानगी असताना सिडकोने जाणीवपूर्वक दोन टप्यात परवानगी देण्याचे निश्चित केले. पहिल्या टप्प्याची मुदत संपली तरी दुसऱ्या टप्प्याची मंजुरी दिलीच नाही. दगडखाण चालकांची मुद्दाम अडवणूक केली जात आहे. यामध्ये कोणाचा काय स्वार्थ दडला आहे याविषयी उलट - सुलट चर्चा सुरू झाली आहे. दसऱ्याच्या दिवशीच हजारो कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शेकडो प्रकल्पग्रस्तांनी खडी व दगड वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज घेवून नवीन वाहने खरेदी केली आहेत. पण खाणीच बंद असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प असून कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे. सिडको प्रकल्प्रग्रस्तांच्या प्रत्येक प्रश्नावर अडवणूकीची भुमिका का घेते असा प्रश्न खाणमालक व प्रकल्पग्रस्त ठेकेदार विचारू लागले आहेत.