शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

विमानतळग्रस्त ओवळे गावावर अपघाताचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:37 IST

विमानतळबाधित वरचे ओवळे गावात भू-सुरुंगांचा दगड घरावर कोसळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- वैभव गायकरपनवेल : विमानतळबाधित वरचे ओवळे गावात भू-सुरुंगांचा दगड घरावर कोसळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दगडामुळे घराला भगदाड पडल्यानंतरही शासकीय यंत्रणांनी तो दगड भू-सुरुंगांचा नसल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून भू-सुरुंग लावताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला आहे.नवी मुंबईत विमानतळासाठी दहा गावे विस्थापित होत आहेत. यामध्ये वरचे ओवळेचा समावेश आहे. गावाच्या मागील बाजूस उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सुरू आहे, यासाठी दररोज ब्लास्टिंग केली जाते. हे ब्लास्टिंग ग्रामस्थाच्या जीवावर बेतत आहे. बुधवारी दुपारी येथील विलास घरत यांच्या घरावर दगड कोसळले. छताला व भिंतीला भगदाड पडून दगड घरात पडले. सुदैवाने घरातील कोणी जखमी झाले नाही. भू-सुरुंगांमुळे परिसरात घरांना मोठ्या प्रमाणात हादरा बसत असतो. अनेक वेळा भांडी कोसळतात, असे प्रकार तर घडतच असतात. मात्र, ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड थेट घरात भिंत आरपार करून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हाला या ठिकाणी जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. सिडकोने अद्याप आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या नाहीत, जर का आम्ही या ठिकाणाहून आमचे घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो, तर सिडको प्रशासन आमच्या मागणी मान्य करण्यास टाळाटाळ करेल, म्हणूनच आम्ही या ठिकाणीही जीव मुठीत धरून राहत असल्याचे येथील ग्रामस्थ बाळाराम म्हसकर सांगतात. ही ब्लास्टिंग सिडको तसेच केंद्राच्या देखरेखीखाली कार्यरत असलेली सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग फ्युअर रिसर्च या संस्थेच्या देखरेखीखाली होत असते. चार ठिकाणी ही ब्लास्टिंग वेगवेगळ्या टप्प्यात केली जाते. मात्र, वरचे ओवळे या ठिकाणच्या घरात उडालेला दगड हा नेमक ा ब्लास्टिंगचा आहे का? याबाबत पोलिसांसह केंद्राच्या मायनिंग फ्युअर रिसर्च संस्थेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे? हा दगड ब्लास्टिंगचाच असल्याविषयी पुरावे नसल्याचे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले असून तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले.छताला आणि भिंतीला भगदाड पाडून दगड कोठून आला? हा प्रश्न उपस्थित होत असेल तर ग्रामस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. कोणाच्या जीवावर बेतणारी घटना घडत असेल आणि शासकीय यंत्रणाला दगड कोठून आला? याबाबत माहिती मिळत नसेल, तर ही आश्चर्याची बाब आहे. ग्रामस्थांमध्ये या घटनेबाबत प्रचंड भीती पसरली आहे. दररोज भीतीच्या छायेत जगावे लागत आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.>काय आहे ब्लास्टिंगची प्रक्रि या? : ब्लास्टिंग करीत असताना सिडको व सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग फ्युअर रिसर्च या दोन्ही संस्थेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असतात. जागा, वेळ निश्चित करून त्याची माहिती दोन्ही संस्थांना दिली जाते. यानंतर या दोन्ही संस्थेचे प्रतिनिधी त्याची पाहणी करीत असतात, त्यानंतर ब्लास्टिंग केले जाते.>बुधवारी घडलेल्या घटनेबाबत दगड नेमका कोठून आला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याबाबत तपास सुरू आहे. कंत्राटदारांनी नियमांचे पालन करून ब्लास्टिंग करावे, याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत.- विनोद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे>स्वत:च्या घरात जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. ब्लास्टिंगमुळे अनेक वेळा घरातील भांडी कोसळत असतात. भूकंपासारखी परिस्थिती निर्माण होते. आम्हाला घरे रिकामी करायचीच आहेत. मात्र, आम्ही घरे सोडल्यास सिडको मागण्यांकडे दुर्लक्ष करेल. सिडकोने आश्वासने पाळावीत, आम्ही घरे रिकामी करू.- बाळाराम म्हसकर, ग्रामस्थ, वरचे ओवळे