शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमधील शाळांमध्ये ड्राय वेस्ट बँक, २७७१ विद्यार्थ्यांचा सहभाग

By नामदेव मोरे | Updated: February 13, 2024 16:42 IST

सहभागी विद्यार्थ्यांना पाॅईंट्स दिले जात असून २ हजार पेक्षा जास्त पॉईंट्स मिळणारांना वेस्ट वॉरिअर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येत आहे.

नवी मुंबई : स्वच्छता अभियानानिमीत्त नवी मुंबई महानगरपालिकेने १५ शाळांमध्ये ड्राय वेस्ट बँक तयार केली आहे. २७७१ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. घरातील सुका कचरा पिशवीमध्ये भरून तो शाळेतील संकलन केंद्रात साठवला जातो. सहभागी विद्यार्थ्यांना पाॅईंट्स दिले जात असून २ हजार पेक्षा जास्त पॉईंट्स मिळणारांना वेस्ट वॉरिअर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येत आहे.              बेलापूर व वाशी विभागातील शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांना सुका कचरा संकलीत करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले जाते. त्यांनी जमा केलेल्या प्लास्टीक बॉटल, चिप्स व चॉकलेट कव्हर, काचेच्या बाटल्या असा सुका कचरा आठवड्यातून एकदा ठरविण्यात आलेल्या दिवशी शाळेत आणला जातो. या कचऱ्यासाठी विद्यार्थ्यांना पॉईंट्स दिले जातात. पेट बॉटलला २, चिप्स, चॉकलेटच्या दहा कव्हरला १, घरगुती प्लास्टीकला २, काचेच्या बॉटलला २, ट्रेट्रा पॅक, टिनल २ पॉईंट्स दिले जातात. प्रत्येक १००, २०० व ५०० पॉईंट्स नंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक शैक्षणिक वस्तुंचे वाटप केले जाते. २ हजार पेक्षा जास्त पॉईंट्स मिळणारांना वेस्ट वॉरीअर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येत आहे.              सीवूडमधील एस एस आयस्कूल मधील शुभम पाल याने २५०० पॉईंट्स मिळविले आहे. दिवाळे महानगरपालिका शाळा क्रमांक २ येथील एकता काळे हिने २०२५ व वाशी गाव शाळेतील वंश शिंदे याने ७०० पॉईंट्स मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते. हा उपक्रम शहरातील इतर शाळांमध्येही सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई