शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरडी धुळवड !

By admin | Updated: March 23, 2016 02:27 IST

राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता यंदा रंगपंचमी पाणी वाया न घालविता साजरी करणे आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या

प्राची सोनवणे, नवी मुंबईराज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता यंदा रंगपंचमी पाणी वाया न घालविता साजरी करणे आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश पोहोचविला जात असून, मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. महानगरपालिकेकडून पाणीपुरवठ्यामध्ये साधारणत: ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीकपात करण्यात आलेली असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण क्षेत्रामध्येही यावर्षी कमी पाऊस झाला असल्याने त्यांच्यामार्फतही मोठ्या प्रमाणात पाणीकपात करण्यात आलेली आहे. होळीच्या दिवशी म्हणजेच २३, २४ मार्चला दैनंदिन नियमित पाणीपुरवठ्याव्यातिरिक्त कोणताही अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. रंगोत्सव साजरा करताना पाण्याचा अपव्यय आणि अनावश्यक वापर टाळावा, तसेच काळजीपूर्वक पाण्याची बचत करून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे. रंगोत्सवासाठी पाण्याचे फुगे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्लास्टिक पिशव्या विकणारा विक्रेता आढळल्यास त्या दुकानदाराकडून दंडवसुली करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रंगांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रंगपंचमीला पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवून निसर्गाचा हिरवा रंग परत आणला पाहिजे. प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याची शपथ घेऊन ग्रीन सिटीसाठी हातभार लावला पाहिजे.- सुनील नाईक, अध्यक्ष, निसर्गप्रेमी फाउंडेशन