शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे घोट नदीवरील प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:05 IST

तळोजातील घोट नदी पुलावरून पलटी झालेल्या कारमधील चौघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.

- शैलेश चव्हाण तळोजा : तळोजातील घोट नदी पुलावरून पलटी झालेल्या कारमधील चौघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ज्या प्रकारे कार नदीत बुडाली ते पाहून परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांची सांगितले.घोट नदीवरील पुलावरून दररोज ५०० ते ७०० गाड्यांची वाहतूक होते. पुलाला सुरक्षा कठडे नसल्याने चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वीस वर्षे जुन्या पुलाची सध्या दुरवस्था झाली आहे. वाहतुकीस अरुंद पूल, त्यात पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पूल अधिकच धोकादायक बनला आहे.घोट पुलाच्या डागडुजीबाबत पनवेलच्या महासभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. किंवा ग्रामस्थांच्या बातमीची दखलही घेण्यात आलेली नाही.- ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक, प्रभाग१घोट नदी पुलावरून कार प्रवाहात बुडाल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूल कमकुवत झाला असून सुरक्षा कठडे नसल्याने धोकादायक बनला आहे. वेळीच दखल न घेतल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- पांडुरंग निघुकर, माजी सरपंच, घोट ग्रामपंचायतहा पूल शेवटची घटका मोजत असून लवकरात लवकर डागडुनी न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे.नदीवरील पुलाची पाहणी करून लवकरच देखभाल दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येईल.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल महानगर पालिका