शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. कामेरकरला दोन वर्षे सहा महिन्यांची शिक्षा

By admin | Updated: May 13, 2016 02:18 IST

एका महिलेसह अन्य समाजातील लोकांना जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचे माणगाव येथील डॉ. संतोष भास्कर कामेरकर याला महागात पडले आहे.

धाटाव :एका महिलेसह अन्य समाजातील लोकांना जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचे माणगाव येथील डॉ. संतोष भास्कर कामेरकर याला महागात पडले आहे. गुरुवारी माणगावच्या सह जिल्हा व सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी त्याला दोषी ठरवून दोन वर्षे सहा महिने आणि ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.माणगाव ग्रामपंचायतीमध्ये २६ जानेवारी २०१३ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभ आटोपल्यानंतर ग्रामसभा सुरु झाली. त्यावेळी आरोपी डॉ. संतोष कामेरकर याने मौजे नोणारे आदिवासी वाडी येथील सर्व्हे नंबर १३५/१ प्रोटेक्ट फॉरेस्ट ही जागा शाळा बांधणीसाठी मिळावी, असा विषय मांडला, परंतु सदरची जागा ही फिर्यादी तारा रामा जाधव आणि फिर्यादीच्या समाजाच्या लोकांच्या वहिवाटीची असल्याने त्याला विरोध केला. त्याचा राग धरुन डॉ. संतोष कामेरकर याने त्यांना जातीवाचक शब्द वापरले, तसेच ते भूमाफिया आणि चोर आहेत, असे डॉ. संतोष कामेरकर बोलला. फिर्यादीसह अन्य हे कातकरी समाजाचे आहेत हे माहीत असतानाही डॉ. कामेरकने याने जातीवाचक शब्द वापरुन त्यांना अपमानित केले होते.या घटनेची फिर्याद माणगाव पोलिसांनी घेतली होती. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार डॉ. कामेरकरवर गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे व सहायक पोलीस निरीक्षक बी.एन.होतमोडे यांनी करुन डॉ. कामेरकर विरोधात माणगावच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. निलेश रातवडकर यांनी काम पाहिले.