शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट कायम, अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 01:19 IST

पुढील काही महिने घरविक्रीच्या परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याने विकासक आणि गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

नवी मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक फटका रियल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. लॉकडाउनमुळे या क्षेत्रातील खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. गुढीपाडव्यापाठोपाठ आता अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही हुकल्याने बांधकाम व्यावसायिकांची पाटी कोरीच राहिली आहे. पुढील काही महिने घरविक्रीच्या परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याने विकासक आणि गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.मागील काही वर्षांपासून बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीतही विविध क्लृप्त्या वापरून विकासक मार्केटमध्ये तग धरून आहेत; परंतु आता कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने रियल इस्टेटचे कंबरडेच मोडले आहे. लॉकडाउनमुळे सुरू असलेले अनेक बांधकाम प्रकल्प बंद आहेत.उद्योजक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती जाहीर करतात; परंतु खरेदीसाठी शुभ मानले जाणारे गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयाचे दोन्ही मुहूर्त हुकल्याने संपूर्ण रियल इस्टेट क्षेत्रात काळजीचे वातावरण आहे.सिडको कार्यक्षेत्रात मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, सध्या कोरोनाचे संकट ओढावल्याने त्याचा फटका घर नोंदणीला बसला आहे.