शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

ढोकाळीचे मिनी स्टेडीअम 1क् महिन्यानंतरही बंदच

By admin | Updated: November 8, 2014 22:52 IST

क्रीडा रसिकांसाठी अथवा क्रीडापटूंसाठी खुले झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदाराने केवळ वापर परवाना सादर न केल्यानेच ते खुले केले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणो : लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अपूर्ण अवस्थेत असलेल्या ढोकाळी येथील मिनी स्टेडिअमचे लोकार्पण होऊन 10 महिन्यांचा कालावधी लोटला तरीसुद्धा ते आजही क्रीडा रसिकांसाठी अथवा क्रीडापटूंसाठी खुले झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदाराने केवळ वापर परवाना सादर न केल्यानेच ते खुले केले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.
लोकसभा निवडणूक लागण्याआधी 8 फेब्रुुवारी 2क्14 रोजी या  मिनी स्टेडिअमचे लोकार्पण तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. परंतु, लोकार्पणापूर्वीच विविध कारणांवरून वादग्रस्त ठरलेल्या या स्टेडिअमचे लोकार्पण झाल्यानंतरही प्रत्यक्षात यामधील अनेक कामे अपूर्णावस्थेत होती. ठाणो महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय तरतूद आणि खासदार निधी असा एकूण सुमारे 24 कोटी 37 लाखांचा खर्च यासाठी करण्यात आला होता. या स्टेडिअममध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, रायफल शूटिंग, लॉन टेनिस, बास्केट बॉल, कॅरम-चेस सेंटर, फिटनेस सेंटर सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार, यामध्ये विविध खेळांसाठी हॉल व कोर्टची सोय करणो आवश्यक होते. मात्र, त्या ठिकाणी खेळासंबंधी अद्ययावत कोणत्याही वस्तू मात्र उपलब्ध केलेल्या नसल्याची बाब लोकमतने उघडकीस आणली होती. परंतु, केवळ या कामाचे श्रेय महापालिकेतील सत्ताधारी मंडळींनी घेऊ नये म्हणून या स्टेडिअमचे लोकार्पण उरकण्यात आले होते. शिल्लक राहिलेले काम एप्रिलमध्ये पूर्ण करून ते क्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांसाठी खुले केले जाईल, असे संबंधित ठेकेदाराने स्पष्ट केले होते. 
परंतु, आता स्टेडिअमचे काम पूर्ण झाले असून अद्यापही ते खुले केले नसल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात काही क्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांनी माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे लेखी तक्रारीदेखील केल्या आहेत. त्यानंतर, त्यांची महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनासुद्धा हे स्टेडिअम खुले करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. केवळ संबंधित ठेकेदाराने वापर परवाना सादर न केल्याने हे स्टेडिअम खुले केले नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. परंतु, आता येत्या काही दिवसांत हा परवाना सादर केला जाणार असून ते खुले होणार असल्याचे पालिका सूत्रंनी स्पष्ट केले. 
 
4ठाणो महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय तरतूद आणि खासदार निधी असा एकूण सुमारे 24 कोटी 37 लाखांचा खर्च यासाठी करण्यात आला होता. 
48 फेब्रुुवारी 2क्14 रोजी या  मिनी स्टेडिअमचे लोकार्पण तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते.
4या स्टेडिअममध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, रायफल शूटिंग, लॉन टेनिस, बास्केट बॉल, कॅरम-चेस सेंटर, फिटनेस सेंटर सुरू करण्यात येत आहेत.