शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेण्याची वाटतेय भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 02:23 IST

कर्मचाऱ्यांमध्ये भीती साईड इफेक्टची भीती, केवळ५५ टक्के कर्मचाऱ्यांनीच केली नोंदणी

वैभव गायकरपनवेल : कोरोनाची लस सर्वात आधी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लसीच्या साइड इफेक्टच्या भीतीमुळे ही लस दुसऱ्या टप्प्यात घ्यावी, अशी अनेकांची भावना आहे. काही कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत उत्सुकता असली, तरी बहुतांशी कर्मचारी वर्गामध्ये लसीबाबत भीती आहे. कोविडच्या लसीकरणाची तयारी शासनाने पूर्ण केली आहे. नुकतीच सर्वत्र या लसीकरणाची ड्रायरन पार पडली. पनवेल महानगरपालिकेने लसीकरणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी शासनाला पाठविली आहे.

कोरोनावर अद्याप कोणत्याही औषध उपलब्ध नसल्याने लसीकरण हा एकमेव पर्याय जगभरात समोर आला आहे. भारतातही याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या भागात या लसीकरणाची रंगीत तालीम पार पडलीआहे. प्रशासन लसीकरणासाठी सज्ज झाले आहे. लवकरच हे लसीकरण सुरूही होणार आहे. लसीकरणाबाबत अनेक समज गैरसमज निर्माण होत आहेत. याबाबत  जनजागृतीची गरज आहे. आरोग्य क्षेत्रीत कार्यरत असलेले काही डॉक्टर्सही पुढे येताना दिसून येत नाहीत. लसीकरणासाठी पालिकेने केलेल्या नोंदणीत अनेक डॉक्टर्सनी लसीकरणासाठी आपले नाव रजिस्टर्ड केले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लस घ्यावी की नाही, अशा अवस्थेत आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांची     काय भावना  लसीबाबत कोणतीही खात्री नाही. लसीची तीव्रता, तिचे साइड इफेक्ट याबाबत अधिकृत माहिती अद्याप आली नाही. कोरोनाशी लढा देत असताना, नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्तीही प्रभावी ठरत असताना, सरसकट लस घेण्यास सर्व जण पुढे येणार नाहीत. मीही पहिल्या टप्प्यात ही एक लस घेण्यास पुढे धजावणार नाही.

तीन टप्प्यांत लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात खासगी, शासकीय आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात मनपा कर्मचारी, अधिकारी व पोलीस तर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील वयोवृद्धांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. शासनाला कर्मचाऱ्यांची यादी दिली आहे.     -डॉ आनंद गोसावी , वैद्यकीय अधिकारी, पनवेल पालिका

कोरोनाची दोन टप्प्यांत लस दिली जाणार आहे. प्रत्येकाला दोन डोस घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक लसीचे काही प्रमाणात साइड इफेक्ट असतात, हे सर्वांना होत नाहीत. काहींना ते काही दिवसांपुरते असतात. सर्व नागरिकांच्या सहकार्यानेच आपला देश कोविडमुक्त होईल- डॉ गिरीश गुणे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पनवेल 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल