शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
बाजारातील मोठा भूकंप! २६ लाख गुंतवणूकदारांनी सोडली ब्रोकरेज फर्मची साथ, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका!
4
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
5
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
6
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
7
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
8
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
9
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
10
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
11
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
12
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
13
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार
14
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
15
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
16
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
17
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
18
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
19
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
20
मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...

नगरसेवकाकडून डॉक्टरला मारहाण

By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST

राष्ट्रवादी काँगे्रसचा नगरसेवक विशाल डोळस याने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामधील डॉक्टरला मारहाण केली. त्याच्याविरोधात नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचा नगरसेवक विशाल डोळस याने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामधील डॉक्टरला मारहाण केली. त्याच्याविरोधात नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. डोळसने यापूर्वी महापालिका रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षकास अपशब्द वापरले होते. नवी मुंबईमध्ये सर्वसामान्य गरीब रुग्णांना स्वस्त उपचारासाठी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ११०० बेड क्षमता असल्यामुळे व रुग्णांना औषधांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सवलतीच्या दरात उपचार केले जात असल्याने येथे रुग्णांची प्रचंड गर्दी असते. अनेक रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जात आहेत. बुधवारी सायंकाळी एका रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तत्काळ तपासणी करून काय झाले असेल व कोणते उपचार करणे आवश्यक आहे याविषयी माहिती दिली. आजाराचे कारण समजल्यानंतर त्यावरील उपचारासाठी किती खर्च येईल व इतर सर्व माहिती नातेवाइकांना दिली. उपचार तत्काळ करणे आवश्यक असल्याचेही निदर्शनास आणून दिले. पण नातेवाइकांनी रुग्णास घरी घेवून जात असल्याचे स्पष्ट केले. डॉक्टरांनी रुग्णाच्या जीवितास धोका असल्याचे निदर्शनास आणून दिले व तुम्ही घरी घेवून जाणार असाल तर तसे लिहून द्या असे सुचविले. नातेवाइकांनी स्वत:च्या जबाबदारीवर रुग्णास घरी नेले. परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने सकाळी पुन्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सोबत असलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक विशाल डोळस यांनी डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरवात केली. येथील व्यवस्थापक डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांना अपशब्द वापरले. कर्तव्यावर असलेले डॉक्टर मन्नू मॅथ्यू यांना मारहाण केली. डॉक्टरांनी झालेला सर्व प्रकार समजावून सांगितल्यानंतरही ऐकून न घेता डोळस यांनी मारहाण केली. डॉक्टर व इतर सहकाऱ्यांना धारेवर धरले. अचानक झालेल्या प्रकारामुळे सर्वच डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. अशाप्रकारे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही. अशा घटनांमुळे डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण होवू शकते असे मत व्यक्त केले. या प्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. डोळस यांनी यापूर्वीही महापालिकेच्या रुग्णालयामध्ये रात्री मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांना अपशब्द वापरले होते. सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असल्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली नव्हती, पण तेथे एक वरिष्ठ पत्रकार उपस्थित असल्याने हा प्रकार निदर्शनास आला होता.मारहाणीचा निषेध डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा रुग्णालयातील सहकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. अशाप्रकारे डॉक्टरांवर हल्ला करणे योग्य नाही. किमान लोकप्रतिनिधींनी तरी जबाबदारीने वागले पाहिजे असे मत व्यक्त केले. सर्वच कर्मचाऱ्यांच्या आग्रहामुळे अखेर डोळसविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मोफत उपचारासाठी एकमेव पर्याय नवी मुंबईमध्ये महापालिकेच्या रुग्णालयामध्ये चांगले उपचार मिळत नाहीत. डॉक्टर नसल्याने इमारती बांधूनही रुग्णालये सुरू झालेली नाहीत. खाजगी रुग्णालयातील उपचार सामान्य नागरिकांना परवडत नाहीत. यामुळे नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. येथे गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. याशिवाय औषधांपासून इतर उपचारामध्येही सवलत दिली जाते. यामुळे नवी मुंबईमधील आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना डी. वाय. मध्ये पाठवत असतात. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकाने मारहाण केल्याने शहरात सर्वत्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.