शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचा अधिका-यांवर भरोसा न्हाय का ? पाहणीच्या निमित्ताने कामांना होतोय विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:10 IST

एका अधिका-याने प्रस्तावित नागरी कामाची पाहणी करुनही पुन्हा आयुक्त अथवा इतर अधिका-यांकडून त्याच कामाची पाहणी होत आहे. यामुळे कामांच्या पाहणीच्या निमित्ताने त्यास मंजुरी मिळण्याला विलंब होत आहे.

नवी मुंबई : एका अधिका-याने प्रस्तावित नागरी कामाची पाहणी करुनही पुन्हा आयुक्त अथवा इतर अधिकाºयांकडून त्याच कामाची पाहणी होत आहे. यामुळे कामांच्या पाहणीच्या निमित्ताने त्यास मंजुरी मिळण्याला विलंब होत आहे. याबाबत स्थायी समितीमध्ये चर्चा करताना, आयुक्तांचा अधिकाºयांवर भरोसा न्हाय का ? असा सूर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी काढला.शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत नेरुळ विभागातील भूखंड क्रमांक ५१ ते तुर्भे उड्डाणपूलपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने नगरसेवक अशोक गुरखे, नामदेव भगत यांंनी इतरही आवश्यक नागरी कामांविषयी सभागृहात चर्चा केली. मात्र प्रशासनाच्या अधिकाºयांचाच एकमेकांवर भरोसा राहिलेला नसल्याची टीका नगरसेविका ऋ चा पाटील यांनी केली. लोकप्रतिनिधीने सुचवलेल्या एखाद्या कामाची पाहणी एका अधिकाºयाने केल्यानंतरही त्या कामाची पाहणी इतर अधिकाºयांसह आयुक्तांकडून होत आहे. यामुळे केवळ पाहणीच्या निमित्ताने प्रस्तावित कामांचा निर्णय लांबणीला जात आहे. अशाच प्रकारे सानपाडा येथील अनेक कामे रखडली असून, याबाबत नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारत असल्याचीही खंत ऋ चा पाटील यांनी व्यक्त केली.यावेळी आयुक्तांंनी ठरवले तर एखाद्या कामाची फाईल एका दिवसात तयार होते. मात्र लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांच्या फायली महिनोमहिने पडून राहत आहे. यामुळे चर्चेच्या बहाण्याने प्रशासनात नवा पायंडा पडत चालला असल्याचाही संताप नगरसेवक नामदेव भगत यांनी व्यक्त केला.सभापती शुभांगी पाटील यांनी देखील प्रशासनाला जनतेची कामे करायची आहेत की नाही असाच प्रश्न निर्माण झालेला असल्याचा टोला मारला. यावेळी प्रशासनाची भूमिका मांडताना शहर अभियंता मोहन डगावकर यांनी संपूर्ण शहरातील रस्त्यांची कामे केली जाणार असून, प्राधान्याने प्रथम प्रमुख रस्त्यांची कामे केली जात असल्याचे सभागृहात सांगितले.तसेच रस्त्यालगत डक्ट बसवण्याचे धोरण प्रशासन घेत असल्याने येत्या काळात सतत खोदकामांना आळा बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच फिफा निमित्ताने जरी मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असली, तरीही इतरही कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होणार नाही याची हमी देखील डगावकर यांनी दिली.