शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा इमारतीतील घरे घेऊ नका

By admin | Updated: April 11, 2017 02:22 IST

विनापरवाना अनधिकृत इमारतीतील सदनिका किंवा व्यावसायिक गाळ्यांची खरेदी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

नवी मुंबई : विनापरवाना अनधिकृत इमारतीतील सदनिका किंवा व्यावसायिक गाळ्यांची खरेदी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच शहरातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षात आलेल्या अतिक्रमणासंदर्भातील तक्रारीवर कार्यवाही करण्याचे सर्वस्वी अधिकारी संबंधित विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिले आहे. त्यामुळे अशा इमारतीतून राहणाऱ्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. असे असले आजही शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. रातोरात नवीन झोपड्या उभारल्या जात आहेत. २0१५ पर्यंतच्या बांधकामांना राज्य सरकारने अभय दिले. त्यामुळे त्यानंतरचीही बांधकामे नियमित होतील, अशा भूलथापा देवून अनधिकृत प्रकल्पातील घरे गरजू ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना थेट आवाहन केले असून फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही बेकायदा प्रकल्पातील सदनिका किंवा व्यापारी गाळ्यांची खरेदी न करण्याचे सूचित केले आहे. घर किंवा गाळे खरेदी करताना संबंधित प्रकल्पाच्या वैधतेची तपासणी करावी, बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र आहे की, नाही याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात अतिक्रमणासंदर्भात येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे विभाग अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. अतिक्रमणासंदर्भातील तक्रारींसाठी ८४२२९५५९१२ हा व्हॉटसअ‍ॅप क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना अतिक्रमणांच्या छायाचित्रांसह या क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरसुध्दा तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)